ह्रतिक रोशनची बहिण डेट करतेय 'या' मुस्लीम पत्रकाराला?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 June 2019

मुस्लीम तरुणावर प्रेम करत असल्याने सुनैनाला रोशन कुटुंबिय मारहाण करत असल्याचे अभिनेत्री कंगणा राणावतची बहिण रंगोलीने म्हटले होते. आता तो मुस्लीम मुलगा कोण हे पुढे आले आहे.

हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनचे नाव सध्या चर्चेत आहे. तिच्या पर्सनल लाईफमध्ये तिला दिल्या जाणाऱ्या त्रासाबद्दल अभिनेत्री कंगना राणावतची बहिण रंगोलीने काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता. मुस्लीम तरुणावर प्रेम करत असल्याने सुनैनाला रोशन कुटुंबिय मारहाण करत असल्याचे रंगोलीने म्हटले होते. आता तो मुस्लीम मुलगा कोण हे पुढे आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनैना सध्या एका पत्रकाराला डेट करतेय. रूहैल अमीन असे त्याचे नाव असून तो काश्मिरी पत्रकार आहे. उत्तर काश्मिरमध्ये राहणारा रुहैल दिल्लीच्या एका न्यूज ऑर्गनायझेशनसाठी काम करतो. विशेष म्हणजे तो विवाहीत आहे.

नुकतेच अभिनेत्री कंगनाची बहीण रंगोली चंदेल हीने सुनैनाबद्दल ट्विटवरुन खळबळजनक खुलासा केला होता. 'सुनैनाचे मुस्लीम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे रोशन कुटुंब तिचा छळ करत आहे.' असा आरोप रंगोलीने केला होता.

मुस्लीम मुलाशी प्रेमसंबंधामुळे ह्रतिकच्या बहिणाचा कुटुंबियाकडून छळ!

यानंतर खुद्द सुनैनानेही 'पिंकविला' या एंटरटेनमेंट पोर्टलशी बोलताना रंगोलीचा हा आरोप खरा असल्याचे सांगितले. 'माझे एका मुस्लीम व्यक्तिवर प्रेम आहे आणि यामुळे माझा छळ सुरु आहे. माझ्या वडिलांनी यामुळे माझ्यावर हात उचलला. तो दहशतवादी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. माझ्या कुटुंबाने रूहैलचा स्वीकार करावा, अशी माझी इच्छा आहे. त्याच्यासोबत लग्नाबद्दल सध्या मी काहीही सांगू शकत नाही. पण मला त्याच्यासोबत राहायचे आहे. त्याच्या धर्मामुळे माझे कुटुंब त्याचा स्वीकार करायला तयार नाही,' असे सुनैनाने यावेळी म्हटले होते. 

काश्मिरच्या एका वेब पोर्टलने यासंदर्भात रूहैलसोबत संपर्क साधला असता, त्याने यावर बोलण्यास नकार दिला. माझ्याकडे याबद्दल बोलण्यासारखे काहीही नाही. बॉलिवूडमध्ये लोक काहीही लिहू शकतात, असे तो म्हणाला. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Weekend is here and it's time for some BFF moments!!

A post shared by RUHAIL (@ruhail.amin) on

काही दिवसांपूर्वी सुनैना जूहू स्थित आपल्या वडिलांचा बंगला सोडून हॉटेलमध्ये शिफ्ट झाली होती. आता ती घरी परतली आहे. 'रूहैल दहशतवादी असता तर मिडीयामध्ये काम करत नसता. त्यामुळे माझ्या कुटुंबाने त्याचा स्वीकार करावा,' असे सुनैनाचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunaina roshan dating muslim journalist ruhail amin