Box Office Collection: 'मिसेस चॅटर्जी'ची कमाई सुरु! 'ज्विगाटो' अन् 'तू झुठी मैं मक्कार ची अवस्था काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunday Box Office Collection of  Tu Jhoothi Main Makkar Mrs Chatterjee Vs Norway Zwigato

Box Office Collection: 'मिसेस चॅटर्जी'ची कमाई सुरु! 'ज्विगाटो' अन् 'तू झुठी मैं मक्कार ची अवस्था काय?

सध्या मनोरंजन विश्वात अनेक नवनविक कल्पनांने पुर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातच या आठवड्यात प्रेक्षकांकडे थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी तीन चित्रपट आहेत. आता प्रेक्षकांचा कल कोणता चित्रपट पाहण्याकडे आहे हे तर बॉक्स ऑफिसचे आकडे पाहिल्यावर समजलेच.

तर सध्या थिएटरमध्ये 'तू झुठी मैं मक्कार', 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' आणि कपिल शर्माचा चित्रपट ' ज्विगाटो' हे चित्रपट आहेत. आता या तिन चित्रपटात बाजी मारली 'तू झुठी मैं मक्कार' आणि 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' यांनी बाजी मारल्याचं बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवरुन दिसत आहे.

तू झुठी मैं मक्कार चित्रपटानं 100 कोटींचा आकडा पुर्ण केला आहे तर 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' चा वीकेंडला वेग वाढवताना दिसत आहेत.मात्र त्याचवेळी कपिल शर्मा स्टारर चित्रपट ज्विगाटोची स्थिती खूपच वाईट आहे.

लव रंजन दिग्दर्शित लव्ह सिनेमा 'तू झुठी मैं मक्कर' या चित्रपटातील रणबीर आणि श्रद्धाची जोडीही लोकांना आवडली आहे. प्रदर्शित झाल्याच्या 12 दिवस नंतरही हा चित्रपट चांगले कलेक्शन केले आहे.

पहिल्या आठवड्यात 50 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाने रविवारी या चित्रपटाने 7.60 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यानुसार या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 109.58 कोटी रुपये झाले इतके झाले आहे.

मिसेस चॅटर्जी Vs नॉर्वेने हा चित्रपट सुरवातीच्या दिवसात काही फारशी चांगली कमाई करु शकला नसला तरी या चित्रपटाने विकेंडला बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबुत करण्याचा प्रयत्न केला आहे.

या चित्रपटाचे केवळ समीक्षकांनीच नाही तर प्रेक्षकांनीही भरभरून कौतुक केले आहे. आशिमा छिब्बर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.

25 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची निर्मिती निखिल अडवाणी, मोनिषा अडवाणी आणि मधु भोजवानी यांनी केली आहे. या चित्रपटाने तिसर्‍या दिवशी ३ कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाची एकूण कमाई 6.73 कोटींवर पोहचली असून या चित्रपटाचे कलेक्शन हे आणखी वाढण्याचा अंदाज लावण्यात येत आहे.

तर दुसरकडे कपिल शर्माच्या ज्विगाटोची बॉक्स ऑफिसवर खुप वाईट स्थीती आहे. या चित्रपटात कपिल फूड डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसतो, जो आर्थिक अडचणींशी संघर्ष करत असताना कसा तरी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहे.

Zwigato च्या कलेक्शनबद्दल सांगायचे तर, सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, रविवारी या चित्रपटाने 75 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची एकूण कमाई 1.80 कोटींवर गेली आहे.