
आडनावाला जागलेला अभिनेता! सुनील शेट्टीचा हॉटेल व्यवसाय पाहून थक्क व्हाल..
Suniel Shetty Birthday : बॉलीवूडचा अण्णा म्हणजेच सुनील शेट्टी. एक प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता. सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) आज 61 वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 11 ऑगस्ट 1961 रोजी कर्नाटकमध्ये झाला. सुनीलने त्याच्या कारकिर्दीत १०० हून चित्रपट केले. एक काळ असा होता की चित्रपटात सुनील शेट्टी असेल तर चित्रपट हीट व्हायचे. आजही त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. आज सुनील मोठ्या प्रमाणात चित्रपटात दिसत नसला तरी पडद्यामागून तो बराच सक्रिय असतो. केवळ चित्रपट विश्वातच नाही तर अण्णाचा हॉटेल व्यवसायातही मोठा हात आहे. त्याच्या वाढदिवासादिवशी जाणून घेऊया थोडक्यात.. (Suniel Shetty Birthday his restaurants hotels lifestyle property)
सुनील शेट्टीचं सध्या पूर्ण लक्ष व्यवसायात आहे. सुनीलचा मुंबईमध्ये रेस्तराँचा व्यवसाय आहे. तो ‘मिसचीफ डायनिंग बार’ आणि ‘क्लब एच २०’ चा मालक आहे. याशिवाय हाकिम आलिम याच्या सलॉनमध्ये सुनीलचे ५० टक्के शेअर्स आहेत. एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार सुनीलने त्याचे पैसे अनेक छोट्या व्यवसायांमध्ये गुंतवले आहेत. त्यामुळे त्याला येणारा नफ्याचा स्त्रोत हा सर्व बाजूने सुरू असतो. काहींच्या मते सुनीलने स्वतःच्या हॉटेल व्यतिरिक्त १२ हून अधिक रेस्टॉरंट मध्ये आर्थिक गुंतवणूक केली आहे.
असं म्हणतात हॉटेल व्यवसायातून मिळणारे सुनीलचे वार्षिक उत्पन्न हे १०० कोटींहून अधिक आहे. केवळ हॉटेल व्यवसायच नाही तर सुनीलचे 'पॉपकॉर्न मोशन पिक्चर्स' नावाने प्रोडक्शन हाऊसही आहे. या प्रोडक्शन हाऊसमधून त्याने ‘रक्त’, ‘भागम भाग’ आणि ‘खेल’ या सिनेमांची निर्मिती केली. याशिवाय ‘आर हाऊस’ नावाचे फॅशन ब्युटिकही त्याचे नावावर आहे .