राहुल म्हणाला, 'हॅलो देवीप्रसाद?' सुनील शेट्टींनी केली कमेंट!

टीम ई-सकाळ
रविवार, 29 डिसेंबर 2019

अथिया आणि राहुल यांची भेट एका पार्टीवेळी झाली होती. या दोघांची कॉमन फ्रेंड असलेल्या आकांक्षा रंजनमुळे हे एकमेकांच्या जवळ आले.

क्रिकेट आणि बॉलिवूडचे घट्ट नाते आपण पाहात आलो आहोत. विवियन रिचर्डस-नीना गुप्ता यांच्यापासून सुरू झालेला हा सिलसिला आणखी दृढ होत गेला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्यामध्ये अफेअर सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अथिया राहुलला डेट करत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात होते. मात्र, या जोडीने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे कधी टाळले नाही. या नात्याबाबत दोघांपैकी कुणीही उघडपणे बोलले नाही. पण त्यांनी हे नाते नाकारलेही नाही. 

- Photo : शेवंता आणि अण्णा गोव्यात करताहेत रोमान्स!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hello, devi prasad....?

A post shared by KL Rahul (@rahulkl) on

नुकताच राहुले इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून हे कपल एका टेलिफोन बूथवर असल्याचं यामध्ये दिसत आहे. राहुल फोनवर बोलत आहे, तर अथिया जोरजोरात हसताना दिसते आहे. राहुलने या फोटोलो 'हेराफेरी' मुव्हीतील एका डायलॉगचं कॅप्शन दिलं आहे. 

'हॅलो, देवीप्रसाद…?' असं कॅप्शन राहुलनं दिल्यानंतर अथियाचे डॅडी अभिनेता सुनील शेट्टी यांनी यावर लाफिंग इमोजीची कमेंट केली आहे. 

- दिल्लीवालोंसे डर लगता है : गुलजार

तत्पूर्वी, अथिया आणि राहुल यांची भेट एका पार्टीवेळी झाली होती. या दोघांची कॉमन फ्रेंड असलेल्या आकांक्षा रंजनमुळे हे एकमेकांच्या जवळ आले. आकांक्षाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केल्याने अथिया-राहुलच्या अफेअरची चर्चा जोर धरू लागली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

summer somewhere  . . @summersomewhereshop x @meghnagoyal1

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty) on

दरम्यान, 2015मध्ये अथियाने बॉलिवूडमध्ये 'हिरो' चित्रपटातून पदार्पण केलं. मात्र, हा चित्रपट जोरदार आपटला. त्यानंतर अनीस बज्मीच्या 'मुबारकाँ', नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'मोतीचूर चकनाचूर'मध्ये दिसली होती. पण हे सगळे चित्रपट फ्लॉप झाले. बॉलिवूड करिअरमध्ये गटांगळ्या खाणाऱ्या अथियाची लव्हलाईफ मात्र, जोरदार सुरू आहे.

- FlashBack 2019 : क्रिकेटमध्ये दांडी; इतर खेळांमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suniel Shetty reacted on Athiya Shetty picture with KL Rahul