केएल राहुलशी अथियाच्या लग्नाचं वृत्त देणाऱ्यांवर भडकले सुनील शेट्टी

'हसावं की रडावं तेच कळेना'
Suniel Shetty, Athiya Shetty, KL Rahul
Suniel Shetty, Athiya Shetty, KL Rahul

अभिनेते सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) ही क्रिकेटर केएल राहुलला (KL Rahul) डेट करतेय. काही दिवसांपूर्वीच अथियाच्या वाढदिवसानिमित्त केएल राहुलने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली. आता या दोघांच्या लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. एका वेबसाइटने सुनील शेट्टींच्या दोन्ही मुलांच्या लग्नाची बातमी दिली. अहान आणि अथिया या वर्षी लग्नबंधनात अडकणार, असा अंदाज त्यांना वर्तवला. यावर सुनील शेट्टी चांगलेच भडकले आहेत.

सुनील शेट्टी यांनी सुनावलं-

'हे वृत्त पाहून हसावं की रडावं तेच कळत नाहीये. कोणतीही तथ्ये पडताळून पाहण्याआधी अंदाज वर्तवण्याची गरज काय, हेच मला समजत नाही. अशा प्रकारच्या बेजबाबदार वार्तांकनामुळे पत्रकारितेच्या विश्वासार्हतेला तडा जातो,' अशी प्रतिक्रिया त्यांनी लग्नाच्या वृत्तावर दिली.

Suniel Shetty, Athiya Shetty, KL Rahul
Pushpa: ३०० गाड्या, १५०० लोक, 'पुष्पा'च्या शूटिंगची गोष्ट निराळी!

अथियाने 2015 मध्ये 'हिरो' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली होती. त्यानंतर तिने मुबारका, नवाबजादे, मोतीचूर चकनाचूर या चित्रपटांमध्ये काम केलं. तर दुसरीकडे अहानने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. साजिद नाडियादवाला निर्मित 'तडप' या चित्रपटात त्याने दमदार अभिनय केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com