लॉकडाऊनमध्ये बोअर झाला असाल तर सुनिल ग्रोवरने दिलाय एक मजेशीर उपाय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

सध्या सगळेचजण होम क्वारंटाईन झाले आहेत..मात्र अनेकांना घरी बसून कंटाळा आला आहे..कॉमेडियन सुनिल ग्रोवरने एका खास अंदाजात त्याच्या चाहत्यांना लॉकडाऊनमध्ये घरात टाईमपास कसा करावा यावर एक मजेशीर उपाय सूचवला

मुंबई- कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी रात्री ८ वाजता मध्यरात्रीपासून ते १४ एु्प्रिल पर्यंत २१ दिवस संपूर्ण देशंच लॉकडाऊन करणार असल्याची घोषणा केली..त्यामुळे सध्या सगळेचजण होम क्वारंटाईन झाले आहेत..मात्र अनेकांना घरी बसून कंटाळा आला आहे..घरी बसून करावं तरी काय असा प्रश्न लोकांना पडलाय..

कोरोनाचं हे संकट भयंकर आहे पण असं असतानाही काही अतिउत्साही लोक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत..यावर अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे..मात्र कॉमेडियन सुनिल ग्रोवरने एका खास अंदाजात त्याच्या चाहत्यांना लॉकडाऊनमध्ये घरात टाईमपास कसा करावा यावर एक मजेशीर उपाय सूचवला आहे.

हे ही वाचा: नोटांमुळे कोरोना पसरु शकतो का?

सुनील ग्रोवरने त्याच्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे..या व्हिडिओमध्ये त्याच्या हातात दोन वाट्या दिसत आहेत..यातील एका वाटीत तांदूळ तर दुस-या वाटीत मूग आहेत..सुनीलने ही दोन्ही धान्य एका वाटीत मिक्स केली आहेत..आणि मग पुन्हा त्यांना वेगळं करत आहे..हा व्हिडिओ शेअर करताना तो सांगतोय, 'सकाळपासून तीन वेळा मी हे असं वेगळं वेगळं करतोय..हा एक मजेशीर गेम आहे.घरात रहा आणि सुरक्षित रहा..' असं सुनीलने त्याच्या अंदाजात म्हटलं आहे..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

On repeat mode. I have solved it 3 times since morning! Stay home, Stay safe.

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover) on

सुनील ग्रोवरच्या या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांच्या देखील मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत..त्याचे चाहते त्याला या गेम व्यतिरिक्त तो घरात कसा वेळ घालवत आहेत असे प्रश्न विचारत आहेत..एका चाहत्याने 'तुम्ही घरातील जेवण बनवण्यासाठी धान्य वेगळं करत आहात का?' असा प्रश्न विचारला आहे..यावर सुनीलने त्याच्याच शैलीत उत्तर देत म्हटलंय की 'अरे, हा तर गेम आहे..घरी कोबी बटाटा भाजी बनत आहे..'

Image result for sunil grover FUNNY

याव्यतिरिक्त सांगायचं झालं तर भारतात कोरोनाबाधितांचा आकडा आता ६०० वर पोहोचला आहे..तर यामुळे ११ जणांचा मृत्यु झाला आहे..या जागतिक संकटामुळे संपूर्ण देश २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे..

sunil grover has unique idea to pas his time in lockdown condition  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunil grover has unique idea to pas his time in lockdown condition