Sunil Shetty: त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉनला फोनवरून शिव्या दिल्या आणि.. सुनील शेट्टीचा धक्कादायक खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 sunil shetty, sunil shetty news, sunil shetty underworld threat

Sunil Shetty: त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉनला फोनवरून शिव्या दिल्या आणि.. सुनील शेट्टीचा धक्कादायक खुलासा

Sunil Shetty Underworld News: अभिनेते सुनील शेट्टी अण्णा सोशल मीडियावर चर्चेत असतात. सुनील शेट्टींचा या वयातला फिटनेस, त्यांची सळसळती एनर्जी अशा अनेक गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा असते.

आता सुनील शेट्टी अण्णा यांनी एक खळबळजनक खुलासा केलाय. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुनील शेट्टींनी थेट अंडरवर्ल्ड डॉनला फोनवरून शिव्या घातल्यात असा त्यांनी खुलासा केला. काय घडलं नेमकं जाणून घेऊ..

(Sunil Shetty reveals about death threats from underworld don)

अभिनेता शंतनूसोबत 'द बार्बरशॉप' या पॉडकास्टवर सुनील शेट्टी पाहुणा म्हणून आला होता की.. सुनीलला अंडरवर्ल्डमधून रोज फोन येत असे. पण तो कधीही कशालाही घाबरला नाही आणि त्याने स्वतःहून या प्रकरणाला हाताळलं.

याबाबत बोलताना सुनील म्हणाले 'आम्ही त्या काळातले आहोत ज्यावेळी मुंबईत अंडरवर्ल्ड धुमाकूळ घालत होते. मला फोन गुंडांकडून की मी हे करेन, मी ते करेन. मी उलट त्यांना शिव्या द्यायचो.

माझ्यासोबत असलेले पोलिस मला म्हणायचे, तू वेडा आहेस का? तुला समजत नाही, डॉनला राग आला तर तो काहीही करू शकतो.

मी म्हणालो काय? माझी काही चूक नाही, माझे तुम्ही संरक्षण कर. मी काय केले? त्यामुळे मी त्या पार्श्वभूमीवर आलो आहे.

सुनील शेट्टी या मुलाखतीत पुढे म्हणाले.. "माझ्या कुटुंबियांना याबद्दल काहीच माहिती नाही.. मी माझ्या आयुष्यात काय केले ते मी अथिया आणि अहानला सांगितले नाही.

मी काही वेडगळ गोष्टी केल्या आहेत. मला एक दुखापत झालेली पण यातून मी स्वतःहुन बरा झालो. याबाबतही कोणालाही सांगितले नाही.

मी नेहमी लोकांना सांगतो की वेळ हा एक चांगला डॉक्टर आहे जो सर्व काही बरे करतो." अशाप्रकारे सुनील शेट्टी यांनी मुलाखतीत स्वतःचं मन मोकळं केलं.