
Sunny Deol-Aishwarya Rai Movie: करोडोंचा खर्च, बोल्ड सीनचा भरणा.. सनी-ऐश्वर्याचा सिनेमा जो कधीच रिलीज झाला नाही..वाचा
Sunny Deol-Aishwarya Rai Movie: बॉलीवूड अभिनेता सनी देओल लवकरच बहुप्रतिक्षित 'गदर २' सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचं शूटिंग जवळपास पूर्ण होत आलं आहे आणि ११ ऑगस्टला सिनेमागृहात 'गदर' रिलीज होणार आहे.
प्रेक्षक सिल्व्हर स्क्रीनवर तारा सिंगला पहायला भलतेच उत्सुक आहेत. सिनेमाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ गेल्या काही दिवसांत व्हायरल झालेले आपण सर्वांनीच पाहिले असतील. आज आम्ही तुम्हाला सनी देओलच्या एका अशा सिनेमाविषयी सांगणार आहोत ज्यात लाखोंचा खर्च झाला होता पण सिनेमा रिलीजच होऊ शकला नाही.
हो..आपण हे बरोबर ऐकलं आहे. अॅंग्री यंग मॅन सनी देओलनं ऐश्वर्या राय सोबत 'इंडियन' नावाच्या एका सिनेमात काम केलं होतं पण काही कारणानं तो सिनेमा डब्बाबंद झाला. (Sunny Deol - Aishwarya Rai Unreleased Movie Inside Story)

Sunny Deol - Aishwarya Rai Unreleased Movie
बॉलीवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांना एकत्र सिल्व्हर स्क्रीनवर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. त्यांच्यापैकीच एक जोडी सनी देओल आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची म्हणता येईल. दोघंही ९० च्या काळात टॉप कलाकारांपैकी एक राहिले आहेत. पण असं असूनही दोघांनी एकत्र कधीच काम केलं नाही.
सनी देओल आणि ऐश्वर्या राय यांना एकत्र 'इंडियन' हा सिनेमा ऑफर झाला होता. हा सिनेमा सगळ्यात महागड्या सिनेमांपैकी एक होता,ज्यावर करोडो रुपये खर्च झाले होते. सिनेमात सनी देओल आणि ऐश्वर्या राय यांच्यावर चित्रित केलेल्या गाण्यात अनेक बोल्ड सीन्स होते. 'फिल्मबीट' डॉटकॉमनं दिलेल्या माहितीनुसार या सिनेमातलं एक गाणं शूट झालं होतं,ज्यावर जवळपास १.७५ करोड खर्च झाले होते. पण त्यानंतर काही कारणानं सिनेमाचं शूट बंद पडलं.
'इंडियन' सिनेमात सनी देओलचा डबल रोल होता. एका भूमिकेत त्यानं आर्मी ऑफिसर साकारला होता,तर दुसऱ्या भूमिकेत तो दहशतवादी बनला होता. सिनेमावर जवळपास साडेचार करोड खर्च झाले होते. पण काही कारणानं अचानक सिनेमाचं शूटिंग थांबवलं गेलं.
अर्थात सिनेमा का रिलीज केला गेला नाही यामागचं कारण आजपर्यंत समोर आलेलं नाही.. एका मुलाखतीत सनी देओल म्हणाला होता की त्याच्यासोबत काजोल,माधुरी दिक्षित,श्रीदेवी सारख्या अभिनेत्रींनी काम करण्यास नकार दिला होता. 'गदर' च्या वेळेस देखील अनेक जणींनी काम करण्यास नाही म्हटलं होतं असा खुलासा देखील सनीनं करत खळबळ उडवली होती.