
Gadar 2: सनी देओल म्हणतोय पाकिस्तानला जायचंय..कारण ऐकाल तर व्हाल हैराण..
Gadar 2: सनी देओल आणि अमिषा पटेल आपला सुपरहिट सिनेमा 'गदर एक प्रेम कथा' चा सीक्वेल घेऊन लवकरच आपल्या भेटीस येत आहेत. 'गदर २' चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे.
२००१ मध्ये या सिनेमाचा पहिला भाग रिलीज केला गेला होता. सिनेमात पाकिस्तानभोवती कथानक गुंफण्यात आलं होतं. पाकिस्तानची निगेटिव्ह शेड सिनेमात दाखवण्यात आली होती.
पण आपल्याला माहितीय का सनी देओलला मात्र तिथल्या लोकांप्रती भयंकर जिव्हाळा आहे अन् तिथं जाण्याची त्याच्या मनात जबरदस्त इच्छा देखील. संबंधित किस्सा चला जाणून घेऊया.(Sunny deol bollywood actor gadar 2 on pakistan)
सनी देओलनं एका मुलाखतीत सांगितलंय की त्याच्यावर पाकिस्तानातील लोकांचे खूप प्रेम आहे. 'आप की अदालत' या कार्यक्रमात त्याला विचारलं गेलं होतं की, 'तो कधी पाकिस्तानात तर जाणार नाही ना'.
यावर अभिनेत्यानं उत्तर दिलं होतं की,''असं काही नाही. जेव्हा संधी चालून येईल तेव्हा नक्की जाईन. कारण तिथले लोक खूपच प्रेमळ आहेत. मला नेहमीच एअरपोर्टवर भेटतात,ईमेल करतात,कुठेही भेटलेयत आतापर्यंत खूप प्रेमाने वागलेयत माझ्याशी,आणि कुटुंबच्या कुटुंब मला भेटतात. कोणाच्या मनात कुठलाच संदेह मला दिसला नाही. हे काही लोक आहेत जे उगाचच पाकिस्तानप्रती चुकीच्या समजुती पसरवत आहेत''.
माहिती समोर येतेय की सनी देओल पाकिस्तानला जाऊन आला आहे. गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्तानं सनी देओल करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तानला गेला होता.
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत 'गदर २' च्या निर्मात्यांनी सिनेमाचं पोस्टर लॉंच केलं होतं. ११ ऑगस्ट २०२३ रोजी 'गदर २' रिलीज होत आहे.
२००१ मध्ये रीलिज झालेला 'गदर' बॉलीवूडच्या इतिहासात सगळ्यात जास्त कमाई केलेल्या सिनेमांपैकी एक आहे. दोन दशकानंतर सिनेमाचा सीक्वेल आपल्या भेटीस येत असल्यामुळे सिनेमाप्रती चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.