सनी देओलच्या मुलाचे 'या' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

करण देओल आणि अभिनेत्री साहेर बम्बाची प्रमुख भूमिका चित्रपटात असणार आहे.

अभिनेता सनी देओल हा बॉलिवूड मध्ये त्याच्या रफटफ भूमिकेसाठी प्रसिध्द आहे. 'ये ढाई किलो का हात जब किसीपर पडता है तब वो उठता नही उठ जाता है' या त्याच्या डॉयलॉगने तरुणाईवर जादू केला होता. आता सनीचा मुलगाही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून सनी त्याच्या मुलाला बॉलिवूडमध्ये येण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

करण देओल आणि अभिनेत्री साहेर बम्बाची प्रमुख भूमिका चित्रपटात असणार आहे. शिवाय चित्रपटात अभिनेता बॉबी देओल सुध्दा काम करत आहे. हा चित्रपट एक रोमॅण्टिक ड्रामा आहे. झी स्टुडिओज आणि सनी साऊंड्स प्रा. लि. निर्मित हा चित्रपट येत्या 19 जुलै ला प्रदर्शित होईल.

मनाली येथे चित्रपटाच्या शूटींगला सुरवात झाली होती. तेव्हा चित्रपटाच्या सेटवर मुलाला बघून सनी भावूक झाला होता. त्याने सोशल मिडीयावर पोस्ट सुध्दा शेअर केली होती. 'आज 'पल पल दिल के पास' चित्रपटाच्या शूटींगला सुरवात झाली आहे. माझ्या मुलाला सेटवर बघून मला विश्वासच बसत नाहीये की तो इतका मोठा कधी झाला...'

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunny Deol launches his son Karan Deol First Look Film Poster out of Pal Pal Dil Ke Paas