Blank Trailer : सनी देओल आणि अक्षय कुमारचा मेहुणा घेऊन येताय अॅक्शनपट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

सनी एकटा चित्रपटातून येणार नाही आहे तर बॉलिवूडला एक नवीन चेहराही सनीच्या आगामी चित्रपटातून मिळणार आहे. करण कपाडिया असे या नवीन कलाकाराचे नाव आहे. 'ब्लँक' या चित्रपटातून सनी आणि करण प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

अभिनेता सनी देओल बऱ्याच दिवसापासून चित्रपटसृष्टीच्या दूर होता. 'यमला पगला दिवाना' हा होम प्रोडक्शन चित्रपट सोडला तर सनी देओल कुठल्याही नवीन प्रोजेक्टमध्ये झळकला नाही. पण आता मात्र सनी एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट घेऊन सज्ज झाला आहे. 

सनी एकटा चित्रपटातून येणार नाही आहे तर बॉलिवूडला एक नवीन चेहराही सनीच्या आगामी चित्रपटातून मिळणार आहे. करण कपाडिया असे या नवीन कलाकाराचे नाव आहे. 'ब्लँक' या चित्रपटातून सनी आणि करण प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. नुकताच 'ब्लँक'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. एक दहशतवादी मानवी बॉम्ब म्हणून दहशतवादी संघटनेकडून सोडण्यात येतो. याबद्दल गुप्तचर यंत्रणेला याची माहिती मिळते. यातून काही सस्पेन्स गोष्टी उलगडत जातात आणि फायटींगचा थ्रिलरही अनुभवायला मिळतो. बेहजाद खंबाटा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

sunny deol

करण हा अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची बहिण सिंपल कपाडिया यांचा मुलगा आहे. चित्रपटात काम करण्यापूर्वी करणचे वजन 118 किलो होते. मात्र त्याने जिम मध्ये घाम गाळून वजनावर नियंत्रण मिळवले. चित्रपटातील फायटिंग सीन्ससाठी करणने बँकॉक येथून मार्शन आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. चित्रपटात इशिता दत्ता आणि करणवीर शर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 'ब्लँक' 3 मे ला प्रदर्शित होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunny Deol starrer Blank Movie trailer release

टॅग्स