अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी उडणार सनी देओलचा मुलगा करणच्या लग्नाचा बार... Karan Deol wedding | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karan Deol

Karan Deol wedding: अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी उडणार सनी देओलचा मुलगा करणच्या लग्नाचा बार...

देओल कुटुंबात लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. करणच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या.

गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा होती.अलीकडेच करण देओल त्याची लॉंग टाइम गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत जूनमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

देओल कुटुंबाला त्यांच्या पर्सनल लाइफला प्रायव्हेट ठेवणे आवडते. सनी देओल आणि बॉबी देओल देखील त्यांच्या कुटुंबाशी संबंधित जास्त माहिती शेअर करत नाहीत. अशा परिस्थितीत खुद्द सनीने अद्याप त्याच्या मुलाच्या लग्नाची घोषणा केलेली नाही.

पण मिळालेल्या माहितीनुसार, करण आणि द्रिशाच्या लग्नाच्या विधी 16 जूनपासून सुरू होतील आणि लग्न 18 जूनपर्यंत होईल. मात्र, हे प्रायव्हेट लग्न असेल असेही मानले जात आहे.

करण देओलच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त खास लोकही हजेरी लावणार आहेत. करण त्याची गर्लफ्रेंड द्रिशाशी मुंबईतच लग्न करणार आहे. म्हणजेच या जोडप्याचे लग्न शाही विवाहासारखे होणार नाही. द्रिशाआणि करण गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

आता या जोडप्याने कायमचे एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी दुबईमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केल्यानंतर 18 फेब्रुवारीला करण आणि द्रिशाची एंगेजमेंट झाली. या जोडीच्या कुटुंबीयांना लग्नाला जास्त विलंब नको आहे. द्रिशा आचार्यचा फिल्मी जगाशी काहीही संबंध नाही. तर करणने 2019 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पण करणच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फ्लॉपचा सामना करावा लागला.