
बी ए च्या दुस-या वर्षाला शिकणा-या त्या विद्यार्थ्यानं जे प्रवेशपत्र सोशल मीडियावर शेयर केलं आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुंबई - भारतात कधी, कुठे, काय होईल याचा काही भरवसा नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी रोजगार हमी योजनेच्या कार्डावर दिपिका पदुकोण आणि जॅकलिन फर्नांडिझचा फोटो असल्याची एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. सरकारी खात्यात अशाप्रकारे कारभार होत असल्यास कसे होणार असे प्रश्नही त्यावेळी नेटक-यांनी विचारले होते. आता तर परिक्षेच्या अॅडमिट कार्डावर सनी लिओनी आणि इमरान हाश्मीचा फोटो आणि नाव व्हायरल झाले आहे.
भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठानं केलेल्या तपासातून ही बाब समोर आली आहे. ज्याच्याकडून ही चूक झाली आहे त्याच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ज्या विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर इमरान हाश्मीचा फोटो छापून आला आहे त्यानं तो त्याच्या इंस्टावर शेयर केला आहे.
परिक्षार्थी विद्यार्थी कुंदन कुमार हा एका महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्यानं आपल्या परिक्षेच्या प्रवेशपत्रावर नावात बदल केल्याचे कळते आहे. इमरान हाश्मी आणि सनी लिओनी हे उत्तर बिहार चे रहिवासी असून ते अविवाहीत असल्याचे म्हटले आहे. वीस वर्षीय त्या विद्यार्थ्याच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हे ही वाचा: "...तर सुभाष घई अभिनेता झाले असते
याविषयी संबंधित विद्यापाठीच्या प्रशासनानं सांगितले की, बी ए च्या दुस-या वर्षाला शिकणा-या त्या विद्यार्थ्यानं जे प्रवेशपत्र सोशल मीडियावर शेयर केलं आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला त्याबाबत नोटीसही पाठविण्यात आली आहे. परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे नाव कुंदन कुमार असून तो धनराज महंतो डिग्री महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे कळते आहे. त्या प्रवेश पत्रावरील वडिलांच्या नावाच्या कॉलममध्ये वडिलांच्या जागी इमरान हाश्मीचं नाव आले आहे. यामुळे ते प्रवेशपत्र चर्चेत आहे.
'आठ वेळा कानाखाली मारलं राव, अशी कशी जाहिरात ? '
यासगळ्या प्रकरणावर आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत. हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक एका प्रसिध्दिच्या अनुषंगाने केला असल्याचे दिसून येते. यात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. चौकशीच्या अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव राम कृष्ण ठाकूर यांनी सांगितले.