चाहत्यांसाठी सनी लिओनचे नवे ऍप लॉन्च

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

गेल्या अनेक दिवसांपासून असे ऍप सादर करण्याची माझी इच्छा होती. ती अखेर पूर्ण झाली आहे. माझ्या विश्वातील चाहत्यांना ऍपमधून संवाद साधता येणार आहे.

मुंबई - जगातील 100 प्रभावशाली महिलांमध्ये समावेश असलेल्या पॉर्नस्टार सनी लिओनने आपल्या चाहत्यांसाठी नवे ऍप सादर केले आहे.

सनी लिओनने न्यूयॉर्कमधील कंपनी एसक्पेसच्या मदतीने हे ऍप सादर केले. या ऍपवरून सनी लिओनची सोशल मिडीयातील फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूब ही खाती जोडलेली असणार आहेत. तसेच ऍपवरून तुम्ही थेट तिच्याशी संवाद साधू शकणार आहात. जगभरात सनी लिओनची संबंधित होत असलेल्या घडामोडी तिचे चाहते ऍपवरून पाहू शकणार आहेत. नोटिफिकेशन्स, सुपरस्टार पोस्ट्स आणि कॉन्टेस्ट्स असे फिचर ऍपमध्ये असणार आहेत. सनीचा एक चाहता दुसऱ्या चाहत्याशी संवाद साधू शकणार आहे.

सनी लिओन म्हणाली, की गेल्या अनेक दिवसांपासून असे ऍप सादर करण्याची माझी इच्छा होती. ती अखेर पूर्ण झाली आहे. माझ्या विश्वातील चाहत्यांना ऍपमधून संवाद साधता येणार आहे. एकाच ठिकाणावरून मला माझे मत मांडता येणार आहे. 

Web Title: Sunny Leone to be more accessible to fans, launches her own app