बर्थडे स्पेशल: अडल्ट सिनेअभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली सनी लिओनी बेकरीत करायची वाढपीचं काम, नर्स बनण्याची देखील होती इच्छा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

सनीने 'करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' या वेबसिरीजमधून तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.

मुंबई- बॉलीवूड सिनेमांमध्ये आणि गाण्यांमध्ये तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री सनी लिओनीचा आज वाढदिवस. सनी लिओनीचं खरं नाव करनजीत कौर आहे. तिने बॉलीवूडच्या अनेक सिनेमांमध्ये तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात तिची नवी इमेज तयार केली. मात्र सनी लिओनीचं वैयक्तिक आयुष्य कोणत्याही सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाहीये. सनीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हे ही वाचा: बाहुबली फेम राणा डग्गुबतीला होकार देणारी मिहीका अभिनेत्री नसून ती आहे 'या' प्रसिद्ध उद्योजकाची मुलगी

बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी सनी लिओनी प्रसिद्ध अडल्ट अभिनेत्री होती, सनी लिओनीने २०१८ आणि २०१९ मध्ये 'करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' या वेबसिरीजमधून तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. या सिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे, सनीने वयाच्या १९ व्या वर्षी अडल्ट सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आणि बघता बघता ती त्या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री बनली.

सनीने तिच्या पॉकेटमनीसाठी अडल्ट सिनेमांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त  जर्मन बेकरी मध्ये वाढपीचं काम सुद्धा करायची. सनी लिओनीचं आधीपासूनंच नर्स बनण्याचं स्वप्न होतं जेणेकरुन ती गरिबांवर उपचार करु शकेल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Thank you so much for all the birthday wishes everyone!! I am so lucky you are all a part of my life!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनीने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, अडल्ट सिनेमात काम करत असल्या कारणाने लोक तिच्यासोबत चुकीचं वर्तन करु लागले होते. तीने सांगितलं, वयाच्या २१ व्या वर्षी माझ्या आयुष्यात काही नकारात्मक गोष्टी घडल्या. अडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याने लोकांनी माझ्याविषयी नको-नको ते बोलायला सुरुवात केली. या गोष्टीचा माझ्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम झाला.

Sunny Leone birthday special: Top 5 Bigg Boss moments of the ...

सनीच्या बॉलीवूड पदार्पणाविषयी सांगायचं झालं तर तिने सगळ्यात आधी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'बिग बॉस'मधून सुरुवात केली. याच शो मध्ये तीने ती अडल्ट अभिनेत्री असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर सनी 'जिस्म-२', 'रागिनी एमएमएस २', 'एक पहेली लीला' यासिनेमांमध्ये झळकली होती. शाहरुखच्या 'रईस' या सिनेमातील सनी लिओनीचं 'लैला' गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. या गाण्यातील डान्ससाठी अनेकांनी तिचं कौतुक केलं होतं. 

Happy Birthday Sunny Leone: 5 things the actress said on motherhood

सनी आणि पती डेनियल वेबर तीन मुलांचे पालक आहेत.

sunny leone birthday special these are known facts about her  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunny leone birthday special these are known facts about her