सनी लिओनीची संपत्ती, बघा ती किती!

सनी लिओनीची संपत्ती, बघा ती किती!

मुंबई: बॉलिवूडमध्ये स्थिरावलेली अभिनेत्री सनी लिओनी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली तिच्याकडे असलेल्या संपत्तीमुळे. पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री अशा प्रवासात सनी लिओनीने विविध चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे. नुकताच तिच्या जीवनावर आधारित ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला. सनी लिओनीचा आजवरचा जीवनप्रवास उलगडल्याने तिच्या लोकप्रियतेमध्ये आणखी वाढ झाली आहे. तिच्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आज अनेक चित्रपटांसाठी तिच्याकडे विचारणा होत आहे

सात वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये ‘जिम्स 2’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या सनीने लोकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, सनीकडे 97 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तसेच वार्षिक दोन किती रुपये उत्पन्न आहे  शिवाय अनेक परदेशी कंपनीची महागडी वाहने तिच्याकडे आहे. शिवाय स्वप्नांचे शहर असलेल्या मुंबईमध्ये 3 कोटी रुपयांचा बंगला आहे. तसेच परदेशात 30 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 

2011मध्ये डॅनिअल वेबरसह लग्न बंधनात अडकलेल्या सनीने  2017 मध्ये त्यांनी निशाला दत्तक घेतले. तसेच सरोगसीच्या माध्यमातून 2018 मध्ये  त्यांना दोन जुळी मुले झाली आहेत. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारी सनी कायम चर्चेत असते. कुटुंबियांसोबतचे किंवा फॅशनसंबंधित विविध फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सनी मल्याळम चित्रपट ‘रंगीला’च्या चित्रीकरणात व्यस्त असून मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये नशीब अजमावणार आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com