बिग बी, थलायवानंतर आता सनी लिओनीच्या आलिशान कारची चर्चा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 10 September 2020

काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी Mercedes-Benz S-Class ही कार खरेदी केली होती. त्यानंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी Lamborghini Urus खरेदी केली होती. आणि आता अभिनेत्री सनी लिओनीने एका आलिशान कारची खरेदी केल्याने ती चर्चेत आहे. 

मुंबई- लॉकडाऊनमध्ये जिथे अनेकांना एक वेळच्या खाण्याची चिंता सतावतेय तिथे सेलिब्रिटी मात्र आलिशान कारच्या खरेदीवर कोट्यावधी रुपयांची उधळण करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी दीड कोटींपेक्षा जास्त किंमत असलेली Mercedes-Benz S-Class ही कार खरेदी केली होती. त्यानंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी ३ कोटींपेक्षा जास्त किंमतीची Lamborghini Urus खरेदी केली होती. आणि आता अभिनेत्री सनी लिओनीने एका आलिशान कारची खरेदी केल्याने ती चर्चेत आहे. 

हे ही वाचा: शिबानी दांडेकरचं अंकिता लोखंडेला प्रत्युत्तर, 'तुला स्वतःची सुशांतसोबतची रिलेशनशिप सांभाळता आली नाही आणि..'  

अभिनेत्री सनी लिओनीला Maserati  Cars ची खूप आवड असल्याचं कळतंय. म्हणुनंच तीने आता आणखी एक Maserati कार खरेदी केली आहे. सनी सध्या अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहतेय. या ठिकाणीच सनीने सफेद रंगाची Maserati Ghibli कार खरेदी केली आहे. सनीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिलंय, 'काल आम्ही हिला घरी आणलं होतं. जेव्हा कधीही मी ही गाडी चालवते मला खूप आनंद होतो.' सनीने कारच्या रंगाशी मॅचिंग असा सफेद ड्रेस घातला आहे. नवीन आवडती कार खरेदी केल्याचा आनंद सनीच्या चेह-यावर दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Brought home this beast yesterday! Every time I drive this car I am so happy! @maserati @maseratiusa

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

Maserati Ghibli बद्दल सांगायचं झालं तर ही एक इटालियन स्पोर्ट्स आलिशान कार आहे. Maserati Quattroporte पेक्षा ही कार खालच्या स्थानावर समजली जाते. कारण Quattroporte पेक्षा Ghibli छोटी आहे. आणि याची डिझाईन खान कपलसाठी केली गेली आहे. यामध्ये V6 इंजिन आहे तर Quattroporte मध्ये V8 मोटार आहे. Ghibli चं इंटिरिअर जास्त चांगलं आहे आणि यात देखील ४ सीट्स आहेत. सोबत ४ दरवाजे देखील आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Yay!! Nothing like picking up my new @maserati with @dirrty99!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

Maserati Ghibli ची किंमत अमेरिकेमध्ये ८०,००० युएस डॉलर म्हणजे  ५९ लाख रुपये आहे. तर भारतात या कारची किंमत १ कोटी ३१ लाखांपासून सुरु होते. कारण ही कार इंपोर्ट करण्याचा खर्च जास्त आहे. सनीची ही तिसरी कार आहे. याआधीही तीने दोन Maserati कार खरेदी केल्या आहेत. यापैकी एक Maserati Ghibli च आहे मात्र ती लिमिटेड एडिशन कार आहे जी सनीने २०१७ सालात खरेदी केली होती. तर दुसरी Quattroporte आहे जी सनीने २०१४ मध्ये खरेदी केली होती. Ghibli ही कार सनीने लॉस एंजेलिसच्या घरी ठेवली आहे तरQuattroporte मुंबईच्या घरी आहे. तिला ही कार इतकी आवडते की तिने वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वर्जनमध्ये या खरेदी केल्या आहेत.   

Sunny Leone Birthday: Maserati fan girl's enviable luxury car collection -  The Financial Express..

sunny leone new car maserati ghibli 3rd maserati luxury car see pics  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunny leone new car maserati ghibli 3rd maserati luxury car see pics