'मला कोरोना काळात...': सनीनं केला तिच्या आजाराचा खुलासा

आता बॉलीवूडमध्ये सनीला वेगळी ओळख (Bollywood Celebrity) मिळाली आहे.
Sunny Leoni
Sunny Leoniesakal

Entertainment News: आता बॉलीवूडमध्ये सनीला वेगळी ओळख (Bollywood Celebrity) मिळाली आहे. ती वेगवेगळ्या बॉलीवूडपटांमध्ये दिसून आली आहे. सोशल मीडियावर (Viral News) नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असणारी सनी लियोनी (Sunny Leoni) ही आता तिच्या एका मुलाखतीमुळे (Bollywood Actress) चर्चेत आली आहे. त्यामध्ये तिनं स्वताला (Socia media news) जडलेल्या आजाराविषयी खुलासा केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. कोरोनाच्या काळात त्या आजाराचा मोठा फटका अनेकांना बसला आहे. तोच आजार आता सनीला झाला आहे. तो एक मानसिक आजार असून सनीनं त्यावर मानसोपचार तज्ञाकडून आजारावर उपचार घेण्यास सुरुवात केली आहे.

सनीनं इंडिया टूडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्याला जडलेल्या आजाराविषयी माहिती दिली आहे. त्या आजाराचे नाव ओसीडी (OCD) असे आहे. कोरोनाच्या काळात अनेकांना या मानसिक आजारानं त्रस्त केल्याचे अनेक संशोधन अहवाल समोर आले आहेत. यावेळी सनीनं घरात आईपण सांभाळत असताना कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागते याविषयी देखील काही खुलासे केले आहेत. सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर यांनी 20 जुलै 2017 रोजी एका मुलीला दत्तक घेतले. तिचे नाव निशा कौर वेबर असे आहे. त्यानंतर एका वर्षानं सनीनं दोन मुलांना सरोगसीव्दारे जन्म दिला. त्यांची नावं नोहा सिंग वेबर आणि अशिर सिंग असे आहे.

Sunny Leoni
Viral Video: मलायकाचा 'KISS', कागदावरील मासा झाला जिवंत

सनीनं तिच्या आजाराविषयी सांगितल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. आपल्याला पँडेमिक काळात ओसीडी झाल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे मला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे तिनं सांगितलं आहे. मला काही एकदम गंभीर स्वरुपाचा ओसीडी झाला आहे असं नाही. मात्र त्याची लक्षणं जाणवत आहे. त्यावर मी वेळीच उपचार घ्यायला सुरुवातही केली आहे. असे तिनं यावेळी सांगितले आहे. मी प्रमाणापेक्षा जास्त एखाद्या गोष्टीची काळजी घ्यायला लागली आहे. त्याचा परिणाम माझ्या व्यक्तिमत्वावर झाल्याचे सनीनं सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com