सनी लिओनीने शेअर केला मोबाईल नंबर...

वृत्तसंस्था | Tuesday, 30 July 2019

अभिनेत्री सनी लिओनी हिने मोबाईल नंबर शेअर केला आहे.

नवी दिल्ली : अभिनेत्री सनी लिओनी हिने मोबाईल नंबर शेअर केला असून, या क्रमांकावर अनेक फोन येत आहेत. सनीने शेअर केलेला मोबाईल नंबर पुनीत अग्रवाल या युवकाचा असून, सततच्या फोनला तो कंटाळला आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून तो मोबाईल क्रमांक वापरत आहे.

रोहित जुगराज दिग्दर्शित 'अर्जुन पटियाला' या चित्रपटात दलजीत दोसांज, क्रिती सेनन आणि वरुण शर्मा यांची प्रमुख भूमिका असून, तो 26 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सनी लिओनी हिची सुद्धा भूमिका आहे. चित्रपटातील एका प्रसंगादरम्यान ती मोबाईल नंबर सांगते. हा नंबर दिल्लीतील पुनीत अग्रवालचा आहे. दिवसभरात त्याला शंभरहून अधिक फोन येत असल्यामुळे तो कंटाळला आहे.

पुनीत म्हणाला, गेल्या 10 ते 12 वर्षांपासून तो मोबाईल क्रमांक वापरत आहे. 26 जुलैपासून मला फोन येण्यास सुरवात झाली. फोन करणारे माझ्याकडे सनी लिओनीबद्दल विचारणा करू लागले. अचानक येऊ लागलेल्या फोनमुळे मला काही समजेनासे झाले. एकाला ला का फोन करत आहात? अशी विचारणा केली असता, त्यांनी मला चित्रपटातील एक क्लिप पाठवली. यानंतर मी 'अर्जुन पटियाला' नावाचा हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाच्या सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये सनी लियोनी एक मोबाईल नंबर सांगते आणि हा नंबर माझाच आहे.'

'रात्री-अपरात्री फोन नुसता खणखणत असतो. दररोजच्या फोनला कंटाळलो आहे. शांतपणे झोपूह शकत नाही. फोन करणारे मला काहीही विचारतात. या त्रासाला कंटाळून मी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि माझा नंबर बोलणाऱ्या अभिनेत्रीविरोधात 28 जुलै रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मला नंबर बदलण्याचा सल्ला दिला. पण, हे शक्य नाही. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून हा नंबर वापरत असून, विविध ठिकाणी हा नंबर आहे. न्यायालयाचे जाणार असून, लवकरात लवकर सुनावणी होईल,' असेही पुनीत म्हणाला.