सनी लिओनी आता मराठीत 

तेजल गावडे 
शुक्रवार, 5 मे 2017

'जिस्म 2' चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी सनी लिओनीने अल्पावधीच बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले.

या वर्षीच्या सुरुवातीला आलेल्या किंग खान शाहरूखसोबत "रईस' चित्रपटात "लैला' या गाण्यावर थिरकत तिने रसिकांची मने जिंकली. आता ती मराठी रसिकांना थिरकवण्यासाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपासून सनी लिओनी मराठीत काम करणार, अशी चर्चा होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

सुप्रीम मोशन पिक्‍चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरअंतर्गत लालासाहेब शिंदे व राजेंद्र शिंदे निर्मित व विशाल देवरूखकर दिग्दर्शित "बॉईज' चित्रपटात सनी आयटम सॉंग करणार आहे. हे गाणे सुनिधी चौहानने गायले असून, नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांचे आहे. संगीत दिग्दर्शन अवधूत गुप्तेने केले आहे. गाण्याचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, या गाण्याबाबत सनीदेखील खूपच उत्सुक आहे.

"बॉईज' या चित्रपटातून एकविरा प्रॉडक्‍शनअंतर्गत संगीत दिग्दर्शक व निर्माता अवधूत गुप्ते प्रस्तुतकर्ता म्हणून लोकांसमोर येत आहे. आम्हाला या चित्रपटाद्वारे मराठीत कधीच झाले नाही असे काहीतरी करून दाखवायचे होते. त्यामुळे सनी लिओनीला चित्रपटात घेण्याचे आम्ही ठरविले, असे अवधूतने सांगितले. 
 
Web Title: Sunny Leone to sizzle in a Marathi item song