सनी लिओनीला घाई नडली; दत्तक मुलीबाबत द्यावे लागणार स्पष्टीकरण

टीम ई सकाळ
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई : सनी लिओनी दरवेळी आपल्या नवनव्या गाण्यांनी चर्चेत असते, पण आता मात्र तिला कायदेशीर बडग्याला उत्तर द्यावे लागणार आहे. सोशल मिडियावर व्यक्त व्हायची घाई तिला नडली आहे. काही दिवसांपूर्वी सनी आणि तिच्या पतीने लातूरची मुलगी निशा दत्तक घेतली. पण तिचा पूर्ण ताबा मिळण्यापूर्वीच तिचा फोटो सनीने सोशल मिडियावर टाकल्याने तिला याबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. येत्या 30 दिवसांत तिला याचे उत्तर द्यावे लागणार आहे. 

नियमानुसार, दत्तक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी बाळाचे डिटेल्स सार्वजनिक करता येत नाहीत. सनीने या नियमाचा भंग केल्याचे राष्ट्रीय बाल आयोगाने स्पष्ट केले आहे. बाल आयोगाचे सदस्य विभांशू जोशी यांनी याबाबत राष्ट्रीय बाल आयोगाकडे तक्रार केली होती. याचीही दखल आयोगाने घेतली आहे. 

सनी लिओनीने ३० सप्टेंबर २०१६ रोजी केंद्रीय दत्तक ग्रहण प्राधिकरणाच्या वेबसाईटवर दत्तक प्रक्रियेसाठी अर्ज केला. ३१ जून २०१७ नंतर कोर्टात दत्तक प्रक्रिया सुरु झाली. याचदरम्यान केंद्रीय दत्तक ग्रहण प्राधिकरणाने निशाला सनीच्या प्री-अ‍ॅडप्शन फास्टर केअरमध्ये दिले. तिथे असतानाच, सनीने तिचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. आता ही घाईच तिच्या अंगलट आली आहे. याबाबत सनीच्या पीआर टीमशी बोलल्यानंतर नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की यावर सनी आणि तिचा पती कायदेशीर उत्तर देतील. यापलिकडे आत्ता काहीच बोलणे शक्य नाही. 

Web Title: sunny lione in new problem esakal news