सनी लिओनीच्या 'त्या' जाहिरातीवर गोव्यात बंदी

टीम ई सकाळ
रविवार, 6 ऑगस्ट 2017

सनीने केलेल्या एका कंडोमच्या जाहिरातीवर गोव्यात बंदी आणण्यात आली आहे. अर्थात ती जाहीरात सरसकट बंद करण्यात आलेली नाही. परंतु, सार्वजनिक ठिकाणी असलेली या जाहिरातींची पोस्टर्स काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पणजी : गुगलने गेल्या वर्षी एक यादी प्रसिध्द केली होती. त्यात सनी लिओनी आघाडीवर होती. ही भारतात सर्वात जास्त सर्च होणाऱ्या कलाकारांची ती यादी होती. म्हणूनच पुढे सनी लिओनीला अनेक जाहीरातींच्या आॅफर्स येेऊ लागल्या. पण आता याच जाहिरातींना काहीसा अंकुश येऊ लागला आहे. सनीने केलेल्या एका कंडोमच्या जाहिरातीवर गोव्यात बंदी आणण्यात आली आहे. अर्थात ती जाहीरात सरसकट बंद करण्यात आलेली नाही. परंतु, सार्वजनिक ठिकाणी असलेली या जाहिरातींची पोस्टर्स काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

गोव्यात काही दिवसांपूर्वी या सनीची या जाहिरातीमधील पोस्टर्स बसवर लावण्यात आली होती. पण स्थानिक महिलांनी त्याविरोधात आक्षेप घेतल्यानंतर व काही निदर्शने केल्यानंतर गोवा सरकारने ही पोस्टर्स काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जाहीर केलेल्या एका निवेदनात सरकारतर्फे भूमिका मांडण्यात आली आहे. या जाहिराती केल्यानंतर अनेक महिलांनी आक्षेप नोंदवले. महिलांना अनेक ठिकाणी वावरणे कठीण होऊन बसले आहे, या तक्रारी आल्यानंतर ही पोस्टर्स बसवरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Web Title: sunny lioni ads goa esakal news

टॅग्स