नाटकाच्या माध्यमातून तरुणपिढी फोडणार समाजातील प्रश्नांना वाचा

मृणाल वानखेडे
Friday, 23 August 2019

- एकिकडे जेवहा समाजात अस्तित्त्वाचे प्रश्न उभे राहतायेत, तिथेच सामाजातिल तरुण पिढी त्याच अस्तित्त्वाच्या प्रश्नांवर तीन नाटकं घेऊन येत आहे.

- 'अकादमी समोर अवहाल', 'सुपारी, 'मुनेरबी' हे सादर होणाऱ्या तीन नाटकांचे नावं. या नाटकांचा प्रयोग पुण्यातील सुदर्शन रंगमंच येथे 31 आॅगस्टला संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. 

एकीकडे जेव्हा समाजात माणसाच्या अस्तित्त्वाचे प्रश्न उभे राहतायेत, तिथेच समाजातील तरुण पिढी त्याच अस्तित्त्वाच्या प्रश्नांवर तीन नाटकं घेऊन येत आहे. 'अकादमी समोर अवहाल', 'सुपारी, 'मुनेरबी' हे सादर होणाऱ्या तीन नाटकांची नावं. या नाटकांचा प्रयोग पुण्यातील सुदर्शन रंगमंच येथे 31 आॅगस्टला संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. 

'मुनेरबी' हे शाहीर अमर शेख यांच्या आई मुनेरबी यांनी रचलेल्या ओव्यांचा संगम आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात मुनेरबी यांनी आपल्या नवऱ्याचा जाच असहाय्य होता, स्वत:च आयुष्या त्यांनी त्या काळात स्वत: फुलवल. त्यांच्या या प्रवासावर भाष्य करणार मुनेरबी हे नाटक आहे. मधुरा पानसे जी हे नाटक सादर करणार आहे, तिनेच या साहित्याचा अभ्यास करुन त्याचे एकत्रीत स्वरुपात लिखाण करुन आपल्यासाठी हे नाटक आणलेल आहे. हा मधुराचा तिसरा प्रयोग आहे.

munerbi

'अकादमी समोर अवहाल' हे नाटक फ्रांझ काफ्का लिखित 'अ रिपोर्ट टु अॅन अकॅडमी' या लघु कथेचा मराठी अनुवाद आहे. फ्रांझ काफ्का एक जर्मन-भाषिक बोहेमियन कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होता. त्याचे लिखाण हे एकणाऱ्याला, बघणाऱ्याला त्याच्या मानसिक, सामाजिक परिस्थितीनुसार भिडणार आहे. काफ्का हा मुळात प्रत्येकाला वेगळा समजतो, असा त्याच्या लिखाणाचा आवाका आहे. त्याच्या अकादमीसमोर अवहाल या नाटकातील माकड वैयक्तिक आणि सामाजिक स्वातंत्र्य यांना गेलेल्या तड्यावर त्याच्या कारणांवर भाष्य करतो. हे नाटक सुरेश कुंभार करणार आहे तर, हा त्याचा अठरावा प्रयोग आहे. 

akadamisamor ahaval

'सुपारी' हे नाटक हॅरोल्ड पिंटरच्या 'द डंब वेटर' चा मराठी अनुवाद आहे. हॅरोल्ड पिंटर ह्याची लेखन कारकीर्दी 50 वर्षांहून अधिक काळाची असुन, तो आधुनिक प्रभावी ब्रिटिश नाटककारांपैकी एक होता. हे नाटक समाकालीन परिस्थितीवर बोलते. राजकारणातील कटुता आणि त्यात भरडल्या जाणाऱ्या तरुणांच्या अवती- भवती हे नाटक फिरते. या नाटकाच सादरीकरण सुरेश कुंभार आणि राजकुमार जरांगे करणार असुन त्यांचा हा चौथा प्रयोग आहे.   

supari
अशा अज्रामर साहित्याचा संगम असलेल्या हा प्रयोग सगळ्यांना अवश्य पहायला आवडेल यात वाद नाही.  तरुण पिढीच्या अस्तित्त्वा विषयीच्या विचारांचा हा मेळावा या महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या भेटिला येतोय. या सामान्य तरुण पिढीचा हा असामान्य प्रयत्न आहे अस म्हणायला हरकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supari, Munerbi and akadamisamor ahaval drama will play in Pune