छोट्या उस्तादांचा 'सुपर डान्सर महाराष्ट्र' मंच आजपासून सज्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

ही त्रयी सोनी मराठीच्या या शोध मोहीमेत महाराष्ट्रात सापडणाऱ्या छोट्या उस्तादांची कला आपले मापदंड लावून प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे.

'सुपर डान्सर' हा प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातल्या छोट्या उस्तादांसाठीच्या या कार्यक्रमासंबंधी माहिती देण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. 

अभिनयाची अचूक जाण असणारे सतीश राजवाडे, 'आता वाजले की बारा' म्हणत रसिकांच्या ह्रदयाचा ठोका चुकवणारी सुंदर अभिनेत्री-नृत्यांगना अमृता खानलविलकर आणि कथाविस्तारावर भर देणारे 'रिंगण' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमाचे निर्माते, 'यंग्राड', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' अशा सिनेमांची कोरीयोग्राफी करणारे विठ्ठल पाटील हे नृत्यशैली आणि त्यातील बारकावे यांबद्दल मुलांचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करतील. ही त्रयी सोनी मराठीच्या या शोध मोहीमेत महाराष्ट्रात सापडणाऱ्या छोट्या उस्तादांची कला आपले मापदंड लावून प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सध्याच्या यंग ब्रिगेडमध्ये मोडणारा अमेय वाघ करणार आहे. आजपासून 'सुपर डान्सर महाराष्ट्र' शो सुरु होत आहे. 

 

super dance maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Super Dance Maharashtra Reality Show