सुपरमॅन झाला 80 वर्षांचा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

सुपरमॅन कितीही मोठा (म्हातारा म्हणता येणार नाही म्हणून) झाला, तरी लहान-मोठ्यांसाठी तो तेवढाच शक्तिशाली आणि जगाला सगळ्या दुष्ट ताकदींपासून वाचवणारा आहे.

आज जर कोणाला विचारले की, निळ्या-लाल रंगाचे कपडे घालणारा सुपरहिरो कोण? तर कोणीही एक सेकंदाचाही विचार न करता सुपरमॅन हे नाव सांगेल. कॉमिक बुक्‍स, स्ट्रीप्स, नॉव्हेल, व्हिडीओ गेम्स आणि चित्रपट या सगळ्या माध्यमांतून भेटायला येणारा सुपरमॅन नुकताच 80 वर्षांचा झाला आहे.

सुपरमॅन कितीही मोठा (म्हातारा म्हणता येणार नाही म्हणून) झाला, तरी लहान-मोठ्यांसाठी तो तेवढाच शक्तिशाली आणि जगाला सगळ्या दुष्ट ताकदींपासून वाचवणारा आहे. 1933 मध्ये क्‍लीवलॅंडला राहणारे जेरी सेगल आणि जो शूस्टर यांनी सुपरमॅन निर्माण केला. 1938 मध्ये तो त्यांनी डिसी कॉमिक्‍सला विकला आणि 1938 मध्ये तो पहिल्यांदा सगळ्या जगासमोर सुपरहिरो म्हणून पुढे आला. त्याच्या सुपरपॉवर्स प्रत्येक मुलाला हव्याहव्याशा वाटू लागल्या आणि प्रत्येक जण सुपरमॅन बनण्याचे स्वप्न पाहू लागला. जेव्हा वॉर्नर ब्रदर्सनी या सुपरहिरोला रुपेरी पडद्यावर आणले, तेव्हा त्याची शान आणखीनच वाढली आणि तो बच्चे कंपनीच्या गळ्यातला ताईत झाला.

आज या सुपरमॅनला 80 वर्ष पूर्ण झालीयेत; पण तो सुपरहिरो आहे आणि सुपरहिरो कधी म्हातारे होत नसतात. त्यामुळे तो बच्चे कंपनीचे मनोरंजन नेहमीच करत राहणार, अशी अपेक्षा करू या! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: superman is 80 years old