सुपरस्टार रजनीकांत यांचा दरबार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आता ते ‘दरबार’ नावाच्या नव्या चित्रपटासह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आता ते ‘दरबार’ नावाच्या नव्या चित्रपटासह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतंच दिवाळीच्या निमित्ताने चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. त्यामध्ये ते पुन्हा एकदा ॲक्‍शन अवतारात पाहायला मिळत आहेत.

जॅकेट, गॉगल आणि हातात बंदूक असा त्यांचा डॅशिंग अंदाज आतापासूनच भाव खाऊ लागला आहे. रजनीकांत यांच्यासोबत अभिनेत्री नयनतारा,  अभिनेता प्रतीक बब्बर, नवाब शाह आणि सुनील शेट्टीदेखील चित्रपटात झळकणार आहेत. ‘गजनी’ चित्रपटाचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगादास यांनीच ‘दरबार’च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाच्या पोस्टरसोबतच त्याची प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. पुढील वर्षी पोंगल सणाच्या दिवशी ‘दरबार’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

web title : Superstar Rajinikanth's new movie will meet the audience soon


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Superstar Rajinikanth's new movie will meet the audience soon