विंक क्वीन प्रिया प्रकाशला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

Supreme Court Rejects FIR Filed Against Priya Prakash Varrier
Supreme Court Rejects FIR Filed Against Priya Prakash Varrier

इंटरनेटवर जिच्या एका अदेनं लाखोंची मनं घायाळ झाली अशी प्रिया प्रकाश वॉरिअरला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला आहे. सिनेमातील गाण्यात एका दृश्यावर काही संघटनांनी आक्षेप घेत प्रिया विरुध्द तक्रार (एफआयआर) दाखल केली होती. मात्र ही तक्रार सुप्रीम कोर्ट पर्यंत पोहोचली आणि आता सुप्रीम कोर्टानं ही तक्रारच रद्द केली आहे. 

'ओरु अदार लव्ह' या सिनेमातील एक दृश्य इंटरनेटवर व्हायरल झाले होते. ज्यात सिनेमातील 'मनिक्य मलाराया पूवी' या गाण्यात प्रिया नायक मोहम्मद रोशन ला डोळा मारताना दिसत आहे. या तिच्या अदेवरच सोशल मिडीयावर अनेकांनी प्रचंड पसंती दर्शविली होती. युट्यूबवर 13 फेब्रुवारीला हा गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. 26 सेकंदाच्या या व्हिडीओची क्रेझ इतकी वाढली की प्रत्येकजण प्रियाबद्दल (सोशल मिडीयावर) चर्चा करु लागला. पण काही सामाजिक संघटनांनी या दृश्याला हरकत घेत पोलिसात तक्रार नोंदवली. 
 



सुप्रीम कोर्टने पद्मावर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या विरुद्ध केलेल्या एफआयआर प्रकरणातील सुप्रीम कोर्टच्या निर्णयाचा हवाला दिला. तसेच राज्य सरकारला सुनावले की, 'कुणातरी सिनेमात काम केले आणि तुम्ही एफआयआर दाखल केली... याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की हे गाणं केरळमध्ये 1978 पासून गायिले जात आहे. त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल व्हायला पाहिजे. कारण आतापर्यंत तर सिनेमा प्रदर्शितही झालेला नाही.'

 

 

Thank you for all the love and support

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com