सुप्रिया विनोद यांना आली आशा काळेंची आठवण

टीम ई सकाळ
मंगळवार, 25 जुलै 2017

जुन्या काळातल्या मराठी चित्रपटांमध्ये आशा काळे हे भारदस्त नाव. सोज्वळ, कष्टाळू स्त्रीच्या, गृहिणीच्या अनेक भूमिका आशाताईंनी अजरामर केल्या. त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेच्या सेटवर आशाताईंची आठवण आली.

मुंबई : जुन्या काळातल्या मराठी चित्रपटांमध्ये आशा काळे हे भारदस्त नाव. सोज्वळ, कष्टाळू स्त्रीच्या, गृहिणीच्या अनेक भूमिका आशाताईंनी अजरामर केल्या. त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेच्या सेटवर आशाताईंची आठवण आली. एक सीन शूट करताना अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी आशाताईंच्या अभिनयाला सलाम केला.

सुप्रिया म्हणतात, 'तुळशीला हात जोडण्याचा सीन केला 'गोठ'मध्ये. आशाताई काळेंची आठवण आली. अशा प्रसंगात पूर्ण कन्व्हिक्शनने काम करण्यात त्या सर्वोत्तम. त्यांच्या टाईपचं काम करायला वेगळीच मजा. तसं जमेलच असं नाही. पण एक प्रामाणिक प्रयत्न... त्यांना सलाम!'

स्टार प्रवाहवरील गोठ या मालिकेत 'कांचन' या भूमिकेचं वर्णन सुप्रिया करतात, "मालिकेत भूमिका करण्याचा एक मोठा फायदा असतो. खूप वेगवेगळ्या छटा साकार करायला मिळतात. चित्रपट किंवा नाटक आपल्याला जास्तीत जास्त तीन तास एक भूमिका रंगवायची संधी देतात. पण मालिकेतली भूमिका नट कित्येक तास जगतो. गोठ मलिकेने मला कांचन म्हणून जगायची फार सुंदर संधी दिली आहे. जशी मी नाही, तशी ही कांचन आहे! खूप अन्तर्मुख, दबलेली,साध्या साध्या आनंदांपासूनही वंचित, मानसिकदृष्टया दुर्बल...एक वेगळी सुंदरभूमिका ...खूप छटा असलेली". त्यांची भूमिका आणि आशा काळे यांच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये हेच साम्य आहे.

Web Title: supriya vinod goth asha kale esakal news