तेजश्री प्रधान बनली अॅंकर

sur nava dhyas nava colors marathi new show esakal news
sur nava dhyas nava colors marathi new show esakal news

१३ नोव्हेंबरपासून सोम ते बुध रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
 
 मुंबई : संगीत म्हणजे ध्यास, संगीत म्हणजे तपस्या आणि संगीत म्हणजे निखळ आनंद. प्रत्येक क्षण खास हवा या सूत्रावर आधारित चैतन्यपूर्ण गाण्यांचा नवा सांगीतिक कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे कलर्स मराठी. सूर आणि ताल यांच्या अनोख्या खेळाने बहरलेला रंगमंच आणि सोबत धमाकेदार वाद्यवृंद  म्हणजे हा सांगीतिक नजराणा. या रंगमंचावर सप्तसुरांच्या दुनियेतील नवनवे अविष्कार प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत त्यांचेच काही लाडके गायक. सूर नवा, ध्यास नवा या कार्यक्रमाद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्रातील लोकप्रिय गायकांना एकाच मंचावर आणून त्यांच्यातील चुरस बघण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे. महाराष्ट्राची लाडकी तेजश्री प्रधान पहिल्यांदाच या कार्यक्रमाद्वारे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे तर आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे तसेच हरहुन्नरी अदाकार अवधूत गुप्ते, स्टनिंग लुक आणि रॉकिंग सूर यांचं फ्युजन असलेली रॉकस्टार शाल्मली खोलगडे या कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत. उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा हा ध्यास सुरु होतोय १३ नोव्हेंबरपासून सोम ते बुध रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.     
 
संगीत आणि गाणं याच्याशी मराठी माणसाची एक वेगळीच नाळ जुळलेली आहे. पारंपरिक शास्त्रीय संगीत असो वा आधुनिक मराठी संगीत रसिकांनी या संगीताला नेहेमीच आपल्या हृदयात जपलं आहे. मराठी रसिकांच्या या संगीत प्रेमाचा विचार करून त्यांच्यासाठी एक अद्भुत मैफल घेऊन येण्याचा विचार कलर्स मराठीने केला आहे. मराठी संगीत क्षेत्रात सध्या महत्वपूर्ण कामगिरी करत असलेली पंधरा रत्नं घेऊन कलर्स मराठीने या मैफिलीचा घाट घातला आहे. या १५ रत्नांनी आपल्या आवाजाने महाराष्ट्रात जरी ओळख निर्माण केली असली तरीही सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या मंचावर सगळेच जण आपला एक नवा सूर शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत. या १५ स्पर्धकांमध्ये वैशाली माडे, प्रसेनजीत कोसंबी, श्रीरंग भावे, जुईली जोगळेकर, ज्ञानेश्वर मेश्राम, प्रल्हाद जाधव यांसारखे अजूनही काही गायक असणार आहेत.
 
या क्षणी बोलताना व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी वायाकॉम -18 चे निखिल साने म्हणाले की, संगीत आणि महाराष्ट्राचं अतूट नातं आहे. मराठी मातीतून अनेक दर्जेदार आणि उत्तम गायक आपल्याला मिळाले आहेत. संगीताबद्दलची हीच आवड लक्षात घेऊन आम्ही प्रेक्षकांसाठी वेगळ्या ढंगाचा कार्यक्रम घेऊन येत आहोत. या कार्यक्रमामध्ये अवधूत गुप्ते परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे जो या स्पर्धकांच्या सांगीतिक प्रवासाचा खरा साक्षीदार आहे त्यामुळेच त्यांच्यातला नवा सूर शोधताना तो त्यांचा मित्र, मार्गदर्शक असणार आहे. महेश काळे जो आज तरुण पिढीचा idol आहे, ज्याचा अभिजात संगीताबरोबरच आधुनिक संगीतामध्ये देखील हातखंड आहे, तसेच वैविध्यपूर्ण गाण्यांनी प्रेक्षकांचे मनं जिंकलेली शाल्मली खोलगडे या तिघांसारखे परीक्षक स्पर्धकांना मिळणं हे त्याचं भाग्य आहे आणि उत्तम कलाकारांमधून सर्वोत्तम कलाकार निवडणं हे परीक्षकांसाठी आव्हान ठरणार आहे. यामुळेच रसिकांना संगीताची विशेष मेजवानी दर आठवड्याला मिळणार आहे.
 
कार्यक्रमाविषयी बोलताना महेश काळे म्हणाले, “या रिअँलिटी शोच्या प्रवासामध्ये मी अगदीच नवखा आहे, माझ्यासाठी हा संपूर्ण प्रवास नवीन आहे, तसेच या कार्यक्रमामध्ये आलेली ही गायक मंडळी अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामधून आलेली आहेत. पण, एक गोष्ट मी आवर्जून सांगेन या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला उत्तम गाणी ऐकायला मिळणार आहेत याचा मला नितांत आनंद आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे  सानिध्य मला लाभले हे माझं भाग्य, त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेल्या अमुल्य गोष्टी या कार्यक्रमाद्वारे मी स्पर्धकांना देण्याचा प्रयत्न करणार आहे”.  
 
कलर्स मराठी कुटुंबाचाच भाग असलेले अवधूत गुप्ते कार्यक्रमाबद्दल म्हणाले, “आजपर्यंत बऱ्याच कार्यक्रमांद्वारे महाराष्ट्रातल्या अनेक मुलांना त्यांची स्वप्ने साकारण्याची संधी मिळाली, त्यांचे कौतुक देखील झाले. या रिऍलिटी कार्यक्रमांनी चांगले गायक तर दिलेच पण या कार्यक्रमांमुळे श्रोत्यांना काय ऐकावं हे देखील समजलं. पण, हा कार्यक्रम वेगळा असणार आहे, कारण इथे असलेल्या प्रत्येक गायकाने संगीतक्षेत्रामध्ये एक विशेष टप्पा पार केला आहे, ज्याला स्वत:ची अशी ओळख आहे आणि या कार्यक्रमामध्ये तो आता त्याच्यामधलाच एक नवीन सूर शोधणार आहे. यामुळे मी कार्यक्रमामध्ये त्यांचा मित्र आणि मार्गदर्शक असणार आहे. हा कार्यक्रम माझ्यासाठी एक वेगळा टप्पा आहे कारण आतापर्यंत कधीच न केलेली गोष्ट मी या कार्यक्रमामध्ये करणार आहे.
 
तेंव्हा बघायला विसरू नका प्रत्येक क्षण खास हवा – सूर नवा ध्यास नवा १३ नोव्हेंबरपासून सोम ते बुध रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com