'सूर नवा ध्यास नवा'चा राजगायक अनिरूध्द जोशी

aniruddha joshi
aniruddha joshi

गेले काही दिवस प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणाऱ्या 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. यात राजगायकाचा मान मिळवला आहे अनिरूध्द जोशी याने. या कार्यक्रमात सेलिब्रेटी गायकांनी उत्तमोत्तम गाणी गाऊन महाराष्ट्राची मने जिंकली. 

15 सेलिब्रेटी गायक स्पर्धकांबरोबर चालू झालेला हा प्रवास अखेर पाच गायकांपर्यंत येऊन पोहोचला. शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, निहिरा जोशी देशपांडे, अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर हे गायक अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. या पर्वात अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून स्पर्धकांना शाबासकीची थाप दिली. तसेच अवधूत गुप्ते, महेश काळे, शाल्मली खोलगडे या कॅप्टनशिप या पर्वात गाजली.   
 
महाअंतिम सोहळ्यात या शिलेदारांनी एकापेक्षा एक सुमधूर गाणी गाऊन पुन्हा एकदा परिक्षकांसमोर प्रश्नचिन्ह निर्णाण केले. पण या सगळ्या फेऱ्या पार करत अखेरीस अनिरूद्ध जोशी हा 'सूर नवा ध्यास नवा' चा अंतिम राजगायक ठरला. जेष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर व अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी महाअंतिम सोहळ्याच्या राजगायकाचे नाव जाहिर केले. 

अनिरुध्द जोशीला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, मानाची कट्यार तसेच केसरी टूर्स तर्फे ऑस्ट्रेलियाचा दौरा तर निहिरा जोशी, प्रेसेनजीत कोसंबी, शरयू दाते आणि विश्वजित बोरवणकर या उपविजेत्यांना पंचाहत्तर हजार रुपयांचा धनादेश असे बक्षिस मिळाले. 

कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी कलर्स मराठीच्या परिवारातील कलाकार उपस्थित होते. राधा प्रेम रंगी रंगली, घाडगे & सून तसेच सरस्वती मालिकेमधील कलाकारांनी महाअंतिम सोहळ्यामध्ये हजेरी लावली. तसेच व्हायाकॉम18 मोशन पिक्चर्सचा आगामी चित्रपट सायकलची टीम - प्रियदर्शन जाधव, हृषीकेश जोशी आणि मैथिली पटवर्धन हे देखील महाअंतिम सोहळ्यास हजर होते. तसेच रणांगण चित्रपटाची टीम स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग उपस्थित होते. कार्यक्रमाचे व पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com