सूरज पांचोली प्रभुदेवाच्या चित्रपटात 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

अभिनेता सूरज पांचोली त्याच्या पहिल्या "हिरो' चित्रपटाच्या अपयशामुळे ताकही फुंकून पितो आहे, असे म्हटले तरी चालेल. त्याचा पहिलाच चित्रपट फार चालला नाही.

त्यामुळे तो सध्या खूप विचार करून चित्रपट स्वीकारतो. त्याने त्याच्या बॉलीवूडमधील पदार्पणाच्या दुसऱ्याच वर्षात तिसरा चित्रपट साईन केला आहे. त्याचा आगामी चित्रपट ऍक्‍शन विनोदीपट असणार आहे.

तसेच हा चित्रपट प्रभुदेवा दिग्दर्शित करतो आहे. सूरजला रेमो डिसूजा आणि अजय देवगण यांच्या चित्रपटांची स्क्रिप्टही आवडली होती; पण त्याने प्रभुदेवाचा चित्रपट स्वीकारला. सप्टेंबरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल. प्रभुदेवाचा चित्रपट सगळ्यांना पाहायला आवडतो. साहजिकच म्हणूनच सूरजने प्रभुदेवाचा हा चित्रपट स्वीकारला असावा. 

Web Title: Suraj Pancholi Prabhudayva's film