Video : एलिमिनेशननंतर सुरेखा पुणेकरांनी लगावला किशोरी शहाणेंना टोला

दिपाली राणे-म्हात्रे
मंगळवार, 9 जुलै 2019

बिग बॉस मराठीमधून एलिमिनेट झाल्यानंतर काय म्हणतात सुरेखाताई पुणेकर? वाचा... 

बिग बॉस मराठीच्या घरातून नुकत्याच बाहेर पडल्या त्या सुरेखा ताई पुणेकर... यावेळी बिग बॉस मराठीच्या घरातले अनेक चांगले-वाईट अनुभव सांगताना त्यांनी किशोरीताईंना टोला लगावला... पँट-शर्ट घातलं म्हणजे जवान होत नाही माणूस असं म्हणत त्यांनी किशोरी ताईंची खटकलेली गोष्ट सांगितली. इतकंच नाही तर बिग बॉस मराठीच्या घरात किशोरी शहाणे हिने मला सतत पाण्यात पाहिलं असंही त्या म्हणाल्या. वाचा सुरेखाताई  पुणेकर यांची सविस्तर मुलाखत-

प्रश्न : बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर मुक्त झाल्यासारखं वाटतंय की वाईट वाटतंय?
सुरेखाताई : बिग बॉस मराठीच्या घरात खुप छान वाटत होतं पण आता बाहेर पडल्यावर खर तर वाईटही वाटतंय आणि चांगलंही. कारण घरात गेल्यावर बाहेरचं सगळं विसरायला झालं होतं पण घरातल्या सततच्या भांडणांचा कंटाळाही आला होता. मेंदूवर परिणाम होतोय की काय असं वाटत होतं. बिग बॉसच्या घरात राहणं सोपं नाही कारण एका ट्रॉफीसाठी तिथे जे एकमेकांसोबत होतं ते खूपंच विचित्र आहे. मी काही काही ठिकाणी जिथे बोलायला हवं होतं तिथे बोलले नाही यासाठी मी प्रेक्षकांची माफी मागते पण हेही सांगते की मला बिग बॉसची भीतीवाटते.मी सहा आठवडे टिकले हेच माझ्यासाठी खूप आहे.

प्रश्न : बिग बॉस मराठीच्या घरातला सगळ्यात वाईट अनुभव कोणता होता?
सुरेखाताई : माझा पहिला वाईट अनुभव नेहा शितोळेसोबतचा. ती सगळ्यांसोबत कटकट करायची आणि दुसरा म्हणजे तिथे खुप थंडी असायची त्यामुळे सतत झोप यायची.. मला आणि बाप्पाला ब्लड प्रेशरचा त्रास असल्याने आम्हाला झोप लागायची जे बिग बॉसच्या नियमाबाहेर असायचं

प्रश्न : सगळ्यात जास्त कोणासोबत मैत्री झाली जी तुम्हाला कायमस्वरुपी
निभवायला आवडेल ?
सुरेखाताई : अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे यांच्यासोबत माझी छान मैत्री झाली.

Image result for surekha punekar in bigg boss

प्रश्न : बिग बॉस मराठीच्या घरात तुम्ही परागसोबत हॉटेल सुरु करण्याचं
प्लॅनिंग करत होतात त्याचं आता काय होणार ?
सुरेखाताई : हो. आता घरातून बाहेर पडल्यावर हॉटेल व्यवसायाचं मी मनावर
घेणार आहे पण माझी अजुन कोणासोबत भेट झाली नाहीये. भेट झाली की मग ठरवू
पुढे.

प्रश्न : एवढ्या दिवसात बाहेरच्या कोणत्या गोष्टी तुम्ही मिस केल्या ?
सुरेखाताई : मोबाईल आणि माझी डान्स- गाणी. आता घरातून बाहेर आल्यावर मला मोबाईलमधील कॉन्टॅक्ट्स आणि ऍप वापरताच येईनासे झाले आहेत इतका त्या घरात गेल्यावर मेंदूवर परिणाम होतो.

प्रश्न : बिग बॉस मराठीविषयी कोणती तुमची तक्रार आहे का ?
सुरेखाताई : बिग बॉस मराठीच्या घरात मिक्सर नाहीये त्यामुळे सगळ्या गोष्टी पाट्यावर वाटायला लागत होत्या..मी एवढे मसाले केले ते काहीच बिग बॉसने दाखवलं नाही... ती त्यांची थीम आहे हे मी मान्य करते पण या गोष्टीमुळे मसाला वाटायला कोणीच येत नव्हते ते नाही दाखवलं. मी पाहुणे आले तेव्हा बेसन, भाकरी, पोळ्या, चिकन, मसाला, ढोबळी मिर्ची, भेंडी, खरडा केला हे का दाखवलं नाही. माझ्यावर अन्याय झालाय.. मी केलेली कामं दाखवली गेली नाहीत याचं मला खूप वाईट वाटतंय...

प्रश्न : टॉप ३ स्पर्धक कोण असतील असं वाटतं ?
सुरेखाताई : शिव ठाकरे, अभिजीत केळकर आणि वैशाली माडे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surekha Punekar interview after bigg boss elimination