सुशांत आणि जॅकलिन "ड्राइव्ह'मध्ये 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

बॉलीवूडचा नवा सुपरस्टार सुशांत सिंग राजपूत आणि गोजिरी जॅकलिन फर्नांडिस ही जोडी तरुण मनसुखानीच्या चित्रपटात असणार अशी चर्चा आहे. फिल्ममेकर तरुण मनसुखानी एका"ड्राईव्ह' नावाच्या हॉलीवूडपटाचा त्याच नावाने हिंदी रिमेक करण्याची तयारी करताहेत. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि जॅकलिनची वर्णी लागली आहे.

या दोघांनीही 2016मध्ये आपल्या हटके अभिनयाने बॉलीवूडला वेड लावलंय. सुशांतची अभिनयातली मेहनत पाहून अनेक निर्माते त्याच्यावर लट्‌टू झालेत आणि जॅकलिनचं काय विचारता? तिचं गोड हसणं, गालावरची खळी याच्या तोडीस तोड डान्सिंग स्टाईल यामुळे ती नेहमीच लक्ष वेधून घेते. आता हे दोघे एकत्र येऊन ड्राईव्ह सिनेमात कसे चार चॉंद लावतात, याचीच उत्सु कता आहे... 

Web Title: Sushant and Jacqueline "in drive''

टॅग्स