रिया चक्रवर्तीला CBI ने चौकशीसाठी पाठवले समन्स, डीआरडीओ गेस्ट हाऊसकडे रवाना झाली रिया

rhea chakraborty CBI
rhea chakraborty CBI

मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात आज सीबीआयच्या तपासाचा ८ वा दिवस आहे. तपासाच्या ८व्या दिवशी सीबीआय या प्रकरणातील मुख्य आरोपी मानल्या जाणा-या रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलवलं आहे. याआधी गुरुवारी सीबीआयने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीची १४ तास चौकशी केली होती. गुरुवारीच रियाचे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांची ईडीने चौकशी केली होती. आता सीबीआयच्या प्रश्नांचा रियाला सामना करावा लागणार आहे.

सुशांत प्रकरणात रिया चक्रवर्तीला मुख्य आरोपी मानलं जात आहे. आणि याबाबतची चौकशी करण्यासाठीच आज सीबीआयने रिया चक्रवर्तीला समन्स पाठवले होते. रिया या चौकशीसाठी तिच्या घरातूनही निघाल्याची माहिती हाती येत आहे. रिया तिच्या घरातून डीआरडीओ गेस्ट हाऊसकडे रवाना झाली आहे. रियाने तिच्यासोबत काही महत्वाची कागदपत्रं देखील घेतली आहेत. जेणेकरुन ती तिची बाजू मांडताना सीबीआयला ती कागदपत्र दाखवू शकेल.  

रियावर सध्या सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा, त्याच्या पैश्यांचा गैरवापर केल्याचा आणि आत्ताच्या नवीन माहितीनुसार बेकायदेशीर ड्रग्स घेण्याचा आरोप आहे. यावर आता रिया कशाप्रकारे स्वतःची बाजू मांडते आणि सीबीआयच्या तपासाला सामोरी जातेय याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 

रिया चक्रवर्तीच्या विरोधात सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केली होती. त्यांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. सुशांतच्या वडिलांनी रियाला सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावला आहे. गुरुवारी या प्रकरणात सुशांतचे वडिल केके सिंह यांनी रियाला खूनी म्हटलं होतं. तसंच तिला लवकरात लवकरत अटक करण्याची देखील मागणी केली होती.   

sushant case updates rhea chakraborty cbi questioning drug connection  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com