सुशांतच्या स्टाफचे १४ जूनचे व्हॉट्सअप चॅट आले समोर, सुशांतनेही दिला होता रिप्लाय

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 1 September 2020

सुशांतच्या घरातील स्टाफचे व्हॉट्सअप मेसेज समोर आले आहेत. यात सध्या सीबीआय चौकशी करत असलेल्या दीपेश सावंतच्या व्हॉट्सअपचा चॅटचा देखील समावेश आहे. हे चॅट १४ जून म्हणजेच ज्या दिवशी सुशांतने आत्महत्या केली त्या दिवसाचे आहेत. 

मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. सुशांतच्या जवळच्या व्यक्तींचे एकानंतर एक व्हॉट्सअप चॅट समोर येत आहेत त्यातंच आता घरातील स्टाफचे व्हॉट्सअप मेसेज समोर आले आहेत. यात सध्या सीबीआय चौकशी करत असलेल्या दीपेश सावंतच्या व्हॉट्सअपचा चॅटचा देखील समावेश आहे. हे चॅट १४ जून म्हणजेच ज्या दिवशी सुशांतने आत्महत्या केली त्या दिवसाचे आहेत. 

हे ही वाचा:  रिया चक्रवर्तीने 'या' कारणासाठी ८ जूनला सोडलं होतं सुशांतचं घर, वकिलांचा खुलासा  

हे चॅट्स १४ जुनचेच आहेत ज्यामधये दीपेश सुशांत बद्दल बोलत आहे. तसंच यात सुशांतने ९ जूनला रिप्लाय देखील केलेला आहे.  सुशांतचं जे चॅट समोर आलं आहे त्यात एका व्यक्तीने लिहिलं आहे 'भाई फ्लिपकार्ट तुझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणाला नंबर देऊ?' यावर सुशांत रिप्लाय देत म्हणतो, 'दीपेश माझ्यासोबत आहे भाई.' 

WhatsApp Chat By Deepesh Sawant Surfaced In Sushant Case - दीपेश सावंत ने  14 जून को सुशांत के फ्लिपकार्ट डील को लेकर की थी बात, व्हाट्सएप चैट से हुआ  खुलासा | Patrika News

यासोबत दीपेश सावंतचे १४ जूनचे चॅट समोर आले आहेत ज्यामध्ये दिपेश एक व्यक्तीला मेसेज करुन सांगत आहे की 'मला सुशांतने फ्लिपकार्ट डिलबाबत तुमच्याशी संपर्कात राहायला सांगितलं आहे.' हे चॅट १४ जूनच्या दिवशी सकाळी १० वाजून ५१ मिनिटांचं आहे. त्यानंतर त्या व्यक्तीकडून दुपारी २ वाजून ४८ मिनिटांनी मेसेज आले आहेत. 'भावा तु ठिक आहेस ना? उत्तर दे हो किंवा नाही.' त्यानंतर ३ वाजून ३४ मिनिटांनी पुन्हा मेसेज आला की 'भावा आम्ही बाहेर आहोत काही गरज लागली तर सांग.' 

पुढच्या मेसेजमध्ये लिहिलंय, 'भावा काही मदत लागली तर आम्हाला फोन कर. आम्ही ५ मिनिटांत तिथे पोहचू.' मात्र या चॅटला दीपेश सावंतने कोणताच रिप्लाय दिलेला नाही. समोर आलेल्या या चॅट्समधून नेमकं काय निष्पन्न होत आहे हे कळू शकलेलं नाही मात्र असा केवळ अंदाज लावला जात आहे की हे चॅट्स सुशांतचा मित्र आणि दिग्दर्शक कुशल जावेरीमधील आहेत. आता याबाबत कधी खुलासा होईल हे वेळ आल्यावरंच कळेल मात्र सीबीआय तपासात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत आहे.   

sushant house staff whatsapp chat surfaced on june 14 sushant also replied to this message  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant house staff whatsapp chat surfaced on june 14 sushant also replied to this message