esakal | सुशांत आणि सारा अली खानच्या रिलेशनशिपबाबत मित्र सॅम्युएलचा धक्कादायक खुलासा, 'यामुळे झालं होतं ब्रेकअप..'
sakal

बोलून बातमी शोधा

samuel haokip on sara ali khan

सुशांतचा मित्र सॅम्यअल होकिपने सुशांतच्या रिलेशनशिपविषयीचा एक धक्कादायक खुलासा केला आहे. सुशांत सिंह राजपूतचा मित्र सॅम्युअल होकिपने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

सुशांत आणि सारा अली खानच्या रिलेशनशिपबाबत मित्र सॅम्युएलचा धक्कादायक खुलासा, 'यामुळे झालं होतं ब्रेकअप..'

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई-  सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत. सुप्रीम कोर्टाने हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. सोशल मिडियावर सुशांतला लवकर न्याय मिळावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. याचदरम्यान सुशांतचा मित्र सॅम्यअल होकिपने सुशांतच्या रिलेशनशिपविषयीचा एक धक्कादायक खुलासा केला आहे.

हे ही वाचा:  'भाभीजी घर पर है' मधील अनीता भाभीने सोडली मालिका, 'ही' अभिनेत्री घेऊ शकते नवीन भाभीची जागा 

सुशांत सिंह राजपूतचा मित्र सॅम्युअल होकिपने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्याने लिहिलंय, मला आठवतंय केदारनाथच्या प्रमोशन दरम्यान सुशांत आणि सारा एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले होते. दोघांना वेगळं करणं कठीण होतं. दोघांमध्येही प्रेम आणि निरागसता होती. सुशांत आणि साराला एकमेकांबद्दल खूप आदर होता जो आजकालच्या रिलेशनशिपमध्ये क्वचित पाहायला मिळतो.

सारा सुशांत सोबतंच त्याच्या आयुष्यात असलेल्या कुटुंबाचा, मित्रांचा आणि त्याच्या स्टाफचा देखील आदर करायची. मला आश्चर्य वाटतं की सोनचिडीया सिनेमा बॉक्स ऑफीसवर आपटल्यानंतर सारा अली खानने सुशांतसोबतचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय बॉलीवूड माफियाद्वारे केलेल्या दबावाच्या कारणामुळे होता? 

सॅम्युएलच्या या खुलास्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. साराने खुलेआम कधी सुशांतच्या मृत्युवर काही प्रतिक्रिया दिली नाहीये मात्र तो गेल्यानंतर तीने त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत श्रद्धांजली दिली होती. साराने सुशांतसोबत केदारनाथ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सॅम्युएल सुशांतचा जवळचा मित्र होता.

त्याने रियाविषयी सांगताना म्हटलं होतं की, रियामुळे सुशांतचं त्याच्या बहिणीशी भांडण व्हायचं. मला सुशांत आणि त्याच्या बहीणीमध्ये झालेल्या भांडणाबद्दल माहित आहे कारण मी तिथेच होतो मात्र मला आत्तापर्यंत याचं कारण कळालं नव्हतं.आत्ता मिडियाने लावलेल्या तर्कामुळे मला ते कळालं. सुशांत यामुळे खूप हैराण झाला होता आणि यानंतर प्रियांका दीदी देखील दिल्ली सोडून निघून गेली होती.   

sushant singh rajput and sara ali khan in a love relationship confirm samuel haokip  

loading image
go to top