कॉलेजच्या आठणींना उजाळा देणारा 'छिछोरे'

वृत्तसंस्था
Friday, 6 September 2019

यारी-दोस्ती आणि त्याचसोबत आयुष्यात 'लूजर' न होण्याची शिकवण देणारा हा चित्रपट आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपुत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा आणि प्रतिक बब्बर अशी दमदार कास्ट असलेला 'छिछोरे' हा चित्रपट आज (शुक्रवार) प्रदर्शित झाला. मैत्री, दोस्ती, यारी यावर हा चित्रपट आधारीत असून 2009 मध्ये आलेल्या '3 इडियट्स' या चित्रपटाची आठवण करुन देतो. यारी-दोस्ती आणि त्याचसोबत आयुष्यात 'लूजर' न होण्याची शिकवण देणारा हा चित्रपट आहे.

'दंगल' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. कॉलेज आणि हॉस्टेल लाईफ प्रेक्षकांच्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्याचं काम या चित्रपटाने केलं आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकारच्या अभिनयाची प्रशंसा प्रेक्षकांकडून केली जात आहे. या चित्रपटामध्ये रोमान्स, कॉमेडी, इमोशन्स असं कमाल कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. त्यामुळेच लोकांनी या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून अनेकांनी चित्रपटाविषयी ट्विट केले आहेत. 

एका युजरने आपली प्रतिक्रिया मांडताना लिहिलं की, "छिछोरे हा खूप चांगला चित्रपट आहे. तो पाहतानाचा अनुभवही खूपच चांगला होता. हा चांगल्या आणि उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. टिम आणि कास्ट यांचं काम अप्रतिम आहे."

तर, दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, "हा चित्रपट येण्याच्या 2 दिवस आधी मला याविषयी काही कल्पना नव्हती. तो पाहण्याचादेखील काही प्लान नव्हता. सकाळीच त्याविषयी चांगले रिव्ह्यू वाचले. चांगल्या अनुभवासाठी आजच तिकीट बुक करा."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput and Shraddha Kapoors Chhichhore Film is Dipped in Nostalgia