esakal | सुशांतसिंह प्रकरण : आत्महत्येपासून अमली पदार्थांपर्यंत, पुढे काय?
sakal

बोलून बातमी शोधा

sushant singh rajput case aiims submitted report to cbi

सुशांतच्या आत्महत्येच्या संशयापासून सुरू झालेला तपास अमली पदार्थ सेवन व वितरणावर केंद्रित झाला.

सुशांतसिंह प्रकरण : आत्महत्येपासून अमली पदार्थांपर्यंत, पुढे काय?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण होतेय. मुंबई पोलिसांबरोबरच केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचलनालय (ईडी) व केंद्रीय अमली पदार्थ विभाग (एनसीबी)सारख्या केंद्रीय यंत्रणांनी त्याचा तपास केला. सुशांतच्या आत्महत्येच्या संशयापासून सुरू झालेला तपास अमली पदार्थ सेवन व वितरणावर केंद्रित झाला. अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांची चौकशी झाली, पण वर्षभरानंतरही सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली, या प्रश्नाचे अधिकृत उत्तर मिळालेले नाही.

गेल्या वर्षी कोरोनाने हजारो नागरिकांचे बळी जात असताना देशात सर्वाधिक ट्रेंडिंग विषय ठरलेल्या अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे कोणतेही पुरावे वर्षभरानंतरही केंद्रीय तपास यंत्रणांना पुढे आणता आले नाहीत. आत्महत्या, हत्येच्या संशयावरून सुरू झालेले हे प्रकरण बॉलीवूडमधील घराणेशाही, तेथील अमली पदार्थांचे सेवन एवढ्यावरच येऊन थांबले. १४ जून २०२० ला सुशांतच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा तपास सर्वप्रथम मुंबई पोलिसांनी हाती घेतला. सुशांतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूशीही त्याच्या मृत्यूचे धागेदोरे जोडले गेले.

हेही वाचा: सुशांतच्या 'त्या' ५० स्वप्नांची यादी अपूर्णच!

अमली पदार्थांसंबंधी संभाषणाचे पुरावे

ईडीच्या तपासात सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपयांचा कोणताही गैरव्यवहार झाल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही. त्यासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सर्व बँक खाती, फोन संभाषण पडताळण्यात आले. त्यात ड्रग्स चॅट व्यतिरिक्त कोणताही गैरप्रकार अद्याप तरी ईडीला आढळला नाही. याप्रकरणी तांत्रिक तपासात मनी लाँडरिंगचे तर नाही, पण अमली पदार्थांसंबंधी संभाषणाचे काही पुरावे ईडीच्या हाती लागले. त्यानी ते केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाला (एनसीबी) सुपूर्द केले. त्यानंतर याप्रकरणात एनसीबीने उडी घेतली.

हेही वाचा: Sushant Singh Case : आतापर्यंत काय घडलं? समजून घ्या संपूर्ण टाइमलाइन

पुढे काय?

नुकतीच सुशांतचा मित्र व रूममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक करण्यात आली आहे. मुळात या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना अटक केल्यानंतर अभिनेता सुशांतसाठी असलेले ड्रग्स रियाच्या सांगण्यावरून खरेदी करण्यात असल्याचा दावा एनसीबीकडून करण्यात आला होता. याप्रकरणी विविध अमली पदार्थ तस्करांचे धागेदोरे पडताळून अनेकांना अटक करण्यात आली. तरीही वर्षभरानंतरही सुशांतची आत्महत्या की हत्या याचा गुंता सुटलेला नाही.

loading image