सुशांतचा मित्र सॅम्युअल होकिपला मिळाली धमकी, एफआयआर केली दाखल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 10 October 2020

सॅम्युअलला धमक्या मिळत आहेत. त्याने सोशल मिडीयावरिल युजरच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्याने याच्याशी संबंधित स्क्रीनशॉट आणि तक्रारीची कॉपी देखील इंस्टा स्टोरीवर पोस्ट केली आहे.   

मुंबई-  सुशांत सिंह राजपूतचा मित्र सॅम्युअल होकिप सुशांतच्या केसमध्ये अनेकदा चर्चेत आला. सॅम्युअल सुशांतसोबत राहायचा. त्यानेच इंस्टाग्रामवर सारा आणि सुशांतच्या नात्याचा खुलासा केला होता. आता सॅम्युअलला धमक्या मिळत आहेत. त्याने सोशल मिडीयावरिल युजरच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्याने याच्याशी संबंधित स्क्रीनशॉट आणि तक्रारीची कॉपी देखील इंस्टा स्टोरीवर पोस्ट केली आहे.   

हे ही वाचा: 'या' कारणामुळे लग्नाचा ५४ वा वाढदिवस साजरा नाही करणार दिलीप कुमार, सायरा बानो यांनी दिली माहिती  

सुशांतने एका चाहत्याने सॅम्युअलच्या इंस्टाग्रामवर डायरेक्ट मेसेज केला. या मेसेजमध्ये लिहिलंय, शपथ घेऊन सांगतो की तुला पश्चाताप करायला देखील वेळ मिळणार नाही. आत्महत्येसाठी तयार राहा तुला भलेही माफियाने वाचवलं असेल मात्र या जगाच्या बदलाच्या भावनेतून कशा वाचशील? हे विसरु नकोस की डार्क वेब हॅकर्स आम्हाला साथ देत आहेत. यावर सॅम्युअलने उत्तर दिलं की मी IPC आणि IT Act 2013 अंतर्गत तुझ्या विरोधात आणि तुझ्या IP ऍड्रेस विरोधात एफआयआर दाखल करत आहे.

insta Samuel Haokip

यावर युजरने लिहिलं, तु माझ्या आणि SSR वॉरिअर्सविरोधात ऍक्शन घेतोयस तर घे. नीच, गद्दार. यामुळे तुझा धोका आणखी वाढेल. या सगळ्यात सुशांतच्या कुटुंबियांनी सीबीआयला पुन्हा एकदा मेडिकल टीमसोबत चर्चा करण्याची मागणी केलीये. AIIMS टीमने सुशांतच्या मृत्युला आत्महत्या असल्याचं सांगत आहे. यामुळे त्याचं कुटुंब आणि चाहते नाराज आहेत.    

sushant singh rajput ex flat mate samuel haokip file fir against insta follower  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput ex flat mate samuel haokip file fir against insta follower