१५ कोटी रुपये ते दागिने गायब होण्यापर्यंत, सुशांतच्या वडिलांनी एफआयआरमध्ये उपस्थित केले हे सात प्रश्न

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 29 July 2020

सुशांतच्या वडिलांनी एकीकडे सुशांतशी संबंधित काही मोठे खुलासे केले आहेत तर दुसरीकडे अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. त्यामुळे सुशांत आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे.  

मुंबई- सुशांतसिंह राजपूतचे वडिल के के सिंह यांनी सुशांतच्या मृत्युच्या जवळपास दीड महिन्यांनंतर मौन सोडलंय. के के सिंह यांनी या प्रकरणात आता अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक धक्कदायक आरोप केले आहेत. या दरम्यान सुशांतच्या वडिलांनी एकीकडे सुशांतशी संबंधित काही मोठे खुलासे केले आहेत तर दुसरीकडे अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. त्यामुळे सुशांत आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे.  

हे ही वाचा: सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरुद्ध दाखल केली एफआयआर

बिहारमध्ये दाखल केलेल्या एफआयआर २४१/ २० प्रकरणात रिया चक्रवर्तीसोबत सहा लोकांच्या विरोधात भादवि  कलम ३४०, ३४१, ३४२, ३८०, ४०६, ४२० आणि ३०६ अंतर्गत केस दाखल केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती व्यतिरिक्त इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सैमुअल मिरिंडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात फसवणूक, बेईमानी, दाबून ठेवणे आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप लावले आहे. एफआयआरमध्ये सुशांतच्या वडिलांनी हे सात मुद्दे उपस्थित केले आहेत. 

१. २०१९ सालाच्या आधी सुशांत एकदम व्यवस्थित होता. तर मग त्याला अचानक डोक्याचा त्रास कसा काय होऊ लागला?

२. जर असं होतं आणि त्याच्यावर उपचार सुरु होते तर मग यासाठी आमची परवानगी काय घेतली गेली नाही?

३. ज्या ज्या डॉक्टरांनी माझ्या मुलावर उपचार केले आणि त्यांनी जी जी औषधं दिली त्या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे.

४. जर रियाला माहित होतं की सुशांत आजारी आहे, तर त्याला एकटं सोडणं, उपचाराची सगळी कागदपत्र आपल्यासोबत घेऊन जाणं, त्याच्याशी सगळीकडून संपर्क तोडणं असं का केलं? याची चौकशी झाली पाहिजे.

५. रिया त्याच्या आयुष्यात आल्यानंतर त्याच्याकडे सिनेमांच्या ऑफर कमी का व्हायला लागल्या? याची चौकशी व्हावी.

६. माझ्या मुलाच्या एका खात्यामधून १५ कोटी रुपये अशा एका एकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले आहेत ज्याच्याशी काही देणं घेणं नाही. तेव्हा त्याच्या सगळ्या बँक खात्यांचा तपास व्हावा.

७. रियाने माझ्या मुलाची महत्वाची कागदपत्र, क्रेडिट कार्ड, दागिने, पैसे, लॅपटॉपसोबत इतर काही सामान का नेलं त्याचा तपास व्हावा.   

sushant singh rajput father kk singh files fir and made serious allegations against rhea chakraborty  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput father kk singh files fir and made serious allegations against rhea chakraborty