युरोप ट्रीपमध्ये एक पेटिंग पाहिल्यापासून विचित्र वागत होता सुशांत, असं काय होतं त्या पेंटिंगमध्ये? वाचा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 12 August 2020

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने याच युरोप ट्रीपशी संबंधित एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली आहे. रियाचा दावा आहे की युरोप ट्रीप दरम्यान सुशांत एक पेंटिंग पाहून विचित्र वागायला लागला होता. 

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर एक गोष्ट सारखी प्रकाशझोतात येत होती ती म्हणजे त्याने रियासोबत केलेली युरोप ट्रीप. या ट्रीपनंतर सुशांत खूप बदलला होता असा दावा केला जातोय. सगळ्यांच्या मनात हा एक प्रश्न आहे की नेमकं या ट्रीप दरम्यान असं काय घडलं होतं ज्यामुळे सुशांत एवढा डिस्टर्ब झाला होता. याबाबत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने याच युरोप ट्रीपशी संबंधित एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली आहे. रियाचा दावा आहे की युरोप ट्रीप दरम्यान सुशांत एक पेंटिंग पाहून विचित्र वागायला लागला होता. 

हे ही वाचा: आमीर खानसह 'या' बॉलीवूड कलाकारांच्या संपर्कात होती रिया चक्रवर्ती, कॉल डिटेल्सचा खुलासा

अशी कोणती होती ती पेटिंग ? त्यात असं काय होतं? ज्यामुळे सुशांत बदलला. रियाच्या म्हणण्यानुसार युरोप ट्रीम दरम्यान सुशांतच्या रुममध्ये एक पेटींग टांगलेली होती. या पेंटिंगमध्ये शनी स्वतःच्याच मुलांना खात होता. जेव्हा रियाने त्याला विचारलं की काय झालं?  तेव्हा तो म्हणाला की तो त्या पेंटिंगमधील पात्राला तो पाहू शकत होता. रियाच्या दाव्यानुसार सुशांतला त्या पेंटिंगमुळे विचित्र गोष्टी दिसायला लागल्या होत्या. रिया ज्या पेंटिंगबाबत दावा करत आहे ती पेंटिंग फ्रांन्सिस्को डी गोयाने बनवली होती.

फ्रांसिस्को डी गोया की पेंटिंग

गोया हे स्पेनचे प्रसिद्ध चित्रकार होते. ही पेंटिंग गोया यांनी ग्रीक परंपरेच्या मान्यतेच्या आधारावर बनवली होती. ज्यानुसार क्रोनस म्हणजेच शनी या भितीमध्ये होता की त्याला त्याची मुलं हरवतील. त्यामुळे प्रत्येक मुलाच्या जन्मानंतर त्याने त्यांना खाऊन टाकलं. गोया यांनी ही पेंटिंग त्यांच्या घरातील भिंतीवर बनवली होती. नंतर त्याचं फ्रेममध्ये रुपांतर करण्यात आलं. याशिवाय सुशांतच्या ट्विटरवरील कव्हर फोटोकडे लक्ष दिलं तर त्याने त्या पेंटरचा फोटो लावला होता ज्याने पेंटिंग बनवल्यानंतर वर्षभरात आत्महत्या केली होती.

अद्वितीय डच चित्रकार आणि  शिल्पकार विंसेंट वॅन गॉग यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी आत्महत्या केली होती.  स्टारी नाईट नावाचं हे पेंटिंग विंसेंट यांनी १८८९ मध्ये बनवलं होत जेव्हा त्यांच्यावर नैराश्याचे उपचार सुरु होते. विसेंट यांनी १८९० मध्ये स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली तेव्हा ते केवळ ३७ वर्षांचे होते. आजही त्यांच्या पेेंटिंगचा अर्थ सांगणं कठीण आहे.   

sushant singh rajput rhea chakraborty europe trip saturn devouring his son francisco goya painting  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput rhea chakraborty europe trip saturn devouring his son francisco goya painting