राजपूत आडनावाला सुशांतसिंहचा रामराम

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्यावर राजपुतांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एम. एस. धोनीफेम सुशांतसिंह राजपूतने ट्‌विटरवरून आपले आडनाव काढून टाकले आहे.

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्यावर राजपुतांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एम. एस. धोनीफेम सुशांतसिंह राजपूतने ट्‌विटरवरून आपले आडनाव काढून टाकले आहे.

जयपूरमध्ये "पद्मावती' चित्रपटाच्या सेटवर राजपुतांच्या "करणी सेने'ने धुमाकूळ घातला आणि भन्साळी यांच्यावर हल्ला केला. या घटनेचा निषेध अवघ्या बॉलिवूडने केला; परंतु सुशांतने ट्‌विटरवरील आपल्या नावापुढचे आडनाव काढून निषेध केला. भन्साळींनी "पद्मावती'चे चित्रीकरण जयपूरमध्ये न करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात सुशांतसिंहने ट्‌विटरवर म्हटले आहे, की जोपर्यंत आपण आपल्या आडनावाला कवटाळून बसू तोपर्यंत आपल्याला हे सहन करावे लागेल. तुमच्यात हिंमत असेल, तर तुम्ही तुमच्या पहिल्या नावालाच तुमची ओळख बनवा. माणुसकी आणि प्रेमाहून कोणतीच जात मोठी नसते. धर्म आणि दयाच आपल्याला मोठे बनवते.

Web Title: sushant singh rajput sheds the surname