सुशांतच्या असिस्टंटचा खुलासा- सुशांतच्या पैश्यांनी रिया करायची पूजा, वर्षभरात तो पूर्णपणे बदलला होता

ankit acharya on sushant
ankit acharya on sushant

मुंबई- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतच्या वडिलांनी सीबीआय तपासाची मागणी केल्यानंतर बिहार सरकारने लगेचच केंद्राकडे यासाठी शिफारस केली आहे. मात्र या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत त्यामुळे या प्रकरणाचा गुंता अजुनच वाढत चालला आहे. आता सुशांतचा असिस्टंट अंकित आचार्यने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

सुशांतचा असिस्टंट अंकित आचार्यने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, 'मी सुशांत भैय्यासोबत त्यांच्या सावलीसारखा राहिलो आहे. त्याच्यासोबत मी तीनवर्ष होतो. अचानक जेव्हा मी गावावरुन परतलो तेव्हा ऑगस्ट २०१९ मध्ये त्याचा संपूर्ण स्टाफ बदलला होता. त्याच्या नवीन बॉडीगार्डने मला घरातही जाऊन दिलं नाही. मला असं वाटतं की रिया मॅडमने संपूर्णच स्टाफ बदलला होता.त्यांनी असं का केलं हे मला माहित नाही.'

अंकित पुढे सांगतो की, 'सुशांत भैय्याच्या नवीन स्टाफने मला सांगितलं होतं की रिया मॅडम  शॉपिंग, खाणं आणि पूजा संबंधित गोष्टींवर खूप खर्च करायच्या. त्यांच्या नवीन कर्मचा-यांनी मला सांगितलं की सतत घरात पूजापाठ सुरु असतो. मला नाही माहित की ही पूजा नेमकी कशासाठी आणि का केली जात होती. सुशांत भैय्या नेहमी मस्तीच्या मूडमध्ये असायचे. ते मला त्यांच्या लहान भावाप्रमाणे मानायचे. मात्र जेव्हा त्यांनी सप्टेंबर २०१९मध्ये माझी संपूर्ण अमाऊंट क्लिअर केली तेव्हा मी त्यांना भेटलो होतो. तो मला थोडा बदलल्यासारखा वाटला. '

अंकितने सांगितलं की 'त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती आणि तो मला खूप नैराश्यात वाटत होता.सुशांत भैय्या कधीच त्याचा रुम आतुन लॉक करत नाहीत. गेल्या तीन वर्षात असं कधीच झालं नव्हतं. मी त्यांच्यासोबत राहिलो आहे म्हणून मी ही गोष्ट मी पूर्ण खात्रीशीर सांगू शकतो. '  

sushant singh rajput suicide case former assistant ankit acharya cbi enquiry  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com