सुशांत मृत्यु प्रकरणात सिद्धार्थ पिठानी आणि दिपेश सावंत बनणार माफीचे साक्षीदार

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 29 August 2020

सुशांत मृत्यु प्रकरणात माफीचा साक्षीदार म्हणून सिद्धार्थ पिठानी आणि दिपेश सावंत समोर येणार असल्याचं म्हटलं जातंय.   

मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात सीबीआय तपास करत आहे. सीबीआयची टीम ८ व्या दिवशी तपासासाठी डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचली होती. तिथे आज या प्रकरणात मुख्य आरोपी मानल्या जाणा-या रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यात आली. सकाळी १०.३० वाजता रिया चौकशीसाठी पोहोचली होती त्यानंतर आता जवळपास ८ तासांच्या चौकशीनंतर रिया गेस्ट हाऊसमधून घरी जाण्यासाठी निघाली आहे. मात्र आत्ताची सगळ्यात मोठी घडामोड अशी की सुशांत मृत्यु प्रकरणात माफीचा साक्षीदार म्हणून सिद्धार्थ पिठानी आणि दिपेश सावंत समोर येणार असल्याचं म्हटलं जातंय.   

हे ही वाचा: गौरव आर्याच्या घरावर ईडीने चिटकवले समन्स, ३१ ऑगस्टला होणार चौकशी 

गेल्या अनेक दिवसांपासून सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. तिने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत स्वतःची बाजू मांडली आहे. मात्र आता पुन्हा एकदा तिच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सुशांतचा रुममेट आणि या प्रकरणात मास्टरमाईंड म्हटलं जाणा-या सिद्धार्थ पिठानीने या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनण्याची इच्छा व्यक्त केल्याचं समोर येतंय. सिद्धार्थ पिठानी याची गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआय कसून चौकशी करत आहे. त्यामुळे सिद्धार्थ माफीचा साक्षीदार बनत रिया चक्रवर्ती विरोधात बोलण्याची शक्यता आहे. कारण त्याने स्वतः तशी इच्छा व्यक्त केली असल्याचं म्हटलं जातंय. सिद्धार्थ माफीचा साक्षीदार झाल्यास रियाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

रिया चक्रवर्तीवर सर्व बाजुने आरोप झाल्यानंतर माध्यमांमध्ये येऊन तिने स्वतःची बाजू क्लिअर केली. या मुलाखतीत तिने तिच्यावर झालेल्या सगळ्या आरोपांच खंडन केलं आहे. तसंच ८ ते १४ जून दरम्यान सुशांतची बहीण मितू सिंह त्याच्यासोबत होती. तिच्याकडून नेमकं काय झालंय ते कळू शकेल असं देखील रियाने म्हटलंय.    

sushant singh rajput suicide case siddharth pithani will be the government witness up  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput suicide case siddharth pithani will be the government witness