सुशांतची शाळा बॅंकॉकला 

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

सुशांतची शाळा बॅंकॉकला होती; पण ती काही दिवसांसाठीच हां. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे चाहते त्याचा आगामी चित्रपट "राबता'ची आतुरतेनं वाट पाहताहेत. या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत यशस्वी व्हावी, अशी अपेक्षा सुशांतला आहे.

या चित्रपटासाठी सुशांतने तीन आठवडे बॅंकॉकमध्ये जिम्नॅस्टिक आणि इतर शस्त्रांचं प्रशिक्षण घेतलं. सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमातील फ्लॅशबॅक सीनमध्ये सुशांत एक योद्धा असून यात लढाई करताना दिसणार आहे. या दृश्‍यात तो नदीच्या मध्यभागी सहा फूट लांब जमिनीवर दहा लोकांचा सामना करताना पाहायला मिळणार आहे.

या दृश्‍यातून हे पात्र किती कौशल्यपूर्ण योद्धा असणार हे आपल्याला कळणार आहे. या दृश्‍याच्या चित्रीकरणादरम्यान मुसळधार पावसामुळे खूप पाणी साचले होते. पण चित्रीकरण थांबवण्याऐवजी संपूर्ण टीमने तिथेच चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. 

याबाबत सुशांत सांगतो की, मुसळधार पावसात पाणी साचलेलं असतानाही आम्ही शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. कारण आमचा आमच्या तय्यारीवर पूर्ण विश्‍वास होता.

प्रत्यक्षात निर्धारित वेळेपेक्षा आमचं चित्रीकरण आधीच पूर्ण झालं. त्यामुळे हे दृश्‍य खूपच मनोरंज झालंय. 

Web Title: Sushant Singh Rajput Take Advanced Weapon Training for Raabta