दीपिकाच्या 'गहराइयां' विरोधात सुशांतचे चाहते आक्रमक;काय घडलंय नेमकं?

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ट्वीटरवर #BoycottBollywood युद्ध पुन्हा सुरू झाले आहे.
Sushant Singh Rajput, Sindhant Chaturvedi, Deepika Padukone
Sushant Singh Rajput, Sindhant Chaturvedi, Deepika PadukoneGoogle

दोन दिवसांपूर्वीच दीपिकाचा (Deepika Padukone) 'गेहराइयां' (Gehriyaan) सिनेमा ओटीटी प्लॅटफ़ॉर्मवर प्रदर्शित झाला आणि सगळीकडून संमिश्र प्रतिक्रिया यावर उमटत आहे. बहुतांशी प्रतिक्रिया या सिनेमा आवडला नसल्यामुळे त्या संदर्भातल्याच आहेत. काही जणांच्या मते हा सिनेमा म्हणजे 'वेस्ट ऑफ टाईम' आहे, तर दुसरीकडे काहींनी स्वतःच्या जीवनाशी हा सिनेमा खूप साधर्म्य साधणारा असल्याने आवडल्याचं देखील म्हटलं आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतनं तर सिनेमावर प्रतिक्रिया देताना हद्दच केली. तिनं चक्क सिनेमाला 'कचरा' म्हणून संबोधलं होतं. अगदी पॉर्न सिनेमांशी देखील 'गहराइयां'ची तुलना केलेली पहायला मिळाली. पण आता या सिनेमाच्या निमित्तानं ट्वीटरवर #BoycotBollywood हॅशटॅग वापरत एक वादग्रस्त ट्रेंड सुरू झालेला पहायला मिळत आहे.

Sushant Singh Rajput, Sindhant Chaturvedi, Deepika Padukone
''लता मंगेशकरांसारखं भाग्य माझं कुठे,माझ्या निधनानंतर जर...''

हा हॅशटॅग पाहिला अनं झरकन मेंदू अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उठलेल्या वादग्रस्त काळात डोकावला. अगदी वर्षभरापूर्वीचीच तर ही गोष्ट आहे. सुशांतच्या कट्टर चाहत्यांनी #BoycottBollywood हॅशटॅग वापरुन 'गहराइयां' विरोधात ट्वीटरवर हा नवा वाद सुरु केलेला पहायला मिळत आहे. म्हणजे पुन्हा बॉयकॉट बॉलीवूड द्वंद्व सुरू झालं म्हणायचं. त्यांनी आता 'गहराइयां' सिनेमातील अभिनेत्री दीपिका पदूकोणला टार्गेट केलेलं पहायला मिळत आहे.

सिनेमाला संमिश्र प्रतिसाद खरंतर मिळत आहे. पण सुशांत सिंग राजपूतच्या त्या कट्टर चाहत्यांनी मात्र 'गहराइयां' सिनेमावर फ्लॉपचा शिक्का मारला आहे. आणि यासंदर्भात ते ट्वीटरवरही प्रचार करीत सुटले आहेत. आणि सिनेमाचं अपयशही साजरं करत आहेत. सुशांतच्या चाहत्यांचे काही ट्वीट आम्ही इथे बातमीत जोडत आहोत. आता या ट्वीटरवरील द्वंद्वामुळे 'गहराइयांं'चे काय होणार याबाबत खरंच शंका निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com