सुशांतच्या गर्लफ्रेंडने खास फोटो शेअर करत केलं बर्थ डे विश !

वृत्तसंस्था
Wednesday, 22 January 2020

सुशांत सिंग एका अभिनेत्रीला डेट करत आहे. त्याच्या गलफ्रेंडने त्याचासोबतचा फोटो शेअर केला आहे.

मुंबई : बॉलिवूडमध्ये नवनवीन कलाकारांची एन्ट्री होतच असते. पण, काही कलाकारांनी मोजकेच सिनेमे करुन आपली जागा निर्माण केली आहे. त्यातील एक नाव आहे सुशांत सिंग राजपुत. सुशांत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बी-टाऊनमध्ये चर्चा आहे ती त्याच्या अफेअरची. सुशांत सिंग एका अभिनेत्रीला डेट करत आहे. त्याच्या गलफ्रेंडने त्याचासोबतचा फोटो शेअर केला आहे.

काल सुशांतचा वाढदिवस होता आणि याच खास दिवशी त्याच्या गर्लफ्रेंडने एक क्युट फोटो शेअर केला आहे. सुशांतच्या आयुष्यात जी खास व्यक्ती आहे तिचं नाव आहे रिया चक्रवर्ती. रिया सुद्धा अभिनेत्री आहे.बरेच दिवस सुशांत आणि रियाने त्यांचं नातं लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्यांचा एकत्र डिनरला आणि एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी ते दोघं पॅरिसमध्ये एकत्र फिरत होते. रियाच्या वाढदिवसाच्यावेळी तिच्या काही मित्रांसोबत लडाखला गेली होती. त्यावेळीही सुशांत आणि रिया एकत्र होते. 

अखेर काल सुशांतच्या वाढदिवसानिमित्त रियाने त्या दोघांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. रियाने शेअर केलेल्या या फोटोवर सुशांतने 'थॅंक यु माय रॉकस्टार' असा रिप्लाय केला आहे. याआधी सुशांतचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. सुशांत आणि अंकिताच्या लव्हस्टोरी सर्वांनाच माहित होती. पण, अनेक वर्षांनंतर त्यांचं नात संपलं. त्यानंतर सुशांतचं नाव क्रिती सॅनन आणि सारा अली खान यांच्याशीही जोडलं गेलं होतं. रिया आणि सुशांतने त्यांच्या नात्याचा अद्याप अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. 

Image may contain: 2 people, people standing

Image may contain: 2 people


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajputs rumored girlfriend shared a photo