सुशांत सिंह राजपूतची संपत्ती किती, आकडा बघून बसेल धक्का 

सुशांत सिंह राजपूतची संपत्ती किती, आकडा बघून बसेल धक्का 

मुंबई- बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये सापडला.  सुशांत सिंह अवघ्या 34 वर्षांचा होता. सुशांतच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. सुशांतनं आपल्या अभियनानं बॉलिवूडमध्ये आपला वेगळाच ठसा उमटवला होता. महेंद्रसिंग धोनीची व्यतिरेखा त्यानं एकदम चोख निभावली. 

करिअरला सुरुवात झाल्यानंतर त्यानं जास्त प्रमाणात सिनेमे केलेत नाहीत. पण सर्वांसमोर एक यशस्वी अभिनेता म्हणून त्याची प्रतिमा होती. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोणी यांच्या कारकिर्दीवर एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात माहीची मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमानं 220 कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. या सिनेमामुळे त्यानं बॉलिवूडमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला. 

सुशांत चांगल्या अभिनेत्यासोबत एक उत्तम डान्सर देखील होता. त्यानं अनेक रिअॅलिटी शोमध्ये निवेदनही केलं होतं. सुशांत एका सिनेमासाठी 5 ते 7 कोटी मानधन घेत होता. तर जाहिरातीसाठी तो 1 कोटी रुपये घ्यायचा. तसंच सुशांतनं रिअल इस्टेट प्रॉपर्टी क्षेत्रातही गुंतवणूक केली होती. 

सुशांतनं इतक्या कमी वेळेत एकूण 80 लाख डॉलर म्हणजे 60 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. बॉलिवूडच्या इतर सेलिब्रेटीप्रमाणेच सुशांत देखील वांद्रे येथील आलिशान घरात राहत होता. त्याला कार आणि स्पोर्ट्स बाईकचा छंद होता. त्यामुळे त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या होत्या. यात मसेराटी क्‍वाटरोपोर्ते, लँड रोव्हर रेंज रोवर एसयूवी, बीएमडब्‍ल्‍यू के 1300 आर स्पोर्ट बाईक आणि इतर गाड्या होत्या.

सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट

कूपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचं पोर्स्टमार्टम झालं असल्याची माहिती समोर आली आहे. तर अवयव पुढील तपासासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आलेत. जे. जे. रुग्णालयात सुशांतच्या अवयवामध्ये कोणतंही विष की अन्य काही गोष्टी आहेत का याची तपासणी केली जाईल. दरम्यान सुशांतनं आत्महत्याच केली असल्याची माहिती पोस्टमार्टममधून समोर आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्यामुळं नैराश्यातूनच सुशांतनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. पोलिसांना त्याच्या घरी उपचारांशी संबंधित एक फाईलही सापडली आहे. मात्र सुशांत औषधंही वेळेवर घेत नव्हता, असंही त्याच्या मित्रांकडून समजतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com