सुशांत जाणार नासाला... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनीची भूमिका साकारण्यासाठी कित्येक तास मैदानावर फलंदाजी व गोलंदाजीचा सराव केला होता. त्यामुळेच तो "एम.एस. धोनी -द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटाला चांगला न्याय देऊ शकला. त्यानंतर आता त्याचा आगामी चित्रपट "चंदा मामा दूर के'मध्ये अंतराळवीराच्या रोलमध्ये दिसणार आहे. त्यामुळे तो काही दिवसांपूर्वी बोइंग उडविण्याचे प्रशिक्षण घेत होता. तर आता तर तांत्रिक बाबी शिकण्यासाठी नासाला जाणार आहे. 

एका मुलाखतीत सुशांतने सांगितले की, "दिग्दर्शक संजय पूरण सिंगने अंतराळातील संपूर्ण माहिती होण्यासाठी पंधरा पुस्तके आणि आठ डॉक्‍युमेंट्रीजची टेप दिली आहे. ज्यात नासाच्या अपोलो मिशनचाही समावेश आहे.' 
सूत्रांच्या माहितीनुसार सुशांत नासामध्ये जवळपास एक महिना राहून अंतराळवीराची देहबोली व त्यांच्या माइंडसेटबद्दल जाणून घेणार आहे. 

Web Title: sushantsingh rajput go nasa