'कोण म्हणेल हिला आताच हार्ट अटॅक येऊन गेलाय..', पाहिलात का 'लॅक्मे फॅशन वीक' मधील सुश्मिताचा व्हिडीओ?Sushmita Sen Ramp Walk Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushmita Sen Video

Sushmita Sen: 'कोण म्हणेल हिला आताच हार्ट अटॅक येऊन गेलाय..', पाहिलात का 'लॅक्मे फॅशन वीक' मधील सुश्मिताचा व्हिडीओ?

Sushmita Sen Video:बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला १५ दिवसांपूर्वीच हार्ट अटॅक आला होता. तिची एंजियोप्लास्टी देखील झाली होती. तिनं स्वतः पोस्ट करत याविषयी आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती.

आता हार्ट अटॅक येऊन मोठी सर्जरी वगैरे झाल्यावर लोक किमान ३ ते ४ महिने आराम करतात हे आपल्याला माहित आहे. पण सुश्मिता सेननं मात्र हा आराम हराम आहे समजत मोठ्या उत्साहात चक्क रॅम्प वॉक केला आहे. एवढ्या मोठ्या आजारानंतर सुश्मिता पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या इव्हेंटमध्ये दिसली असेल.

लॅक्मे फॅशन वीकच्या तिसऱ्या दिवशी सुश्मितानं पारंपरिक अंदाजात आपली जादू रॅम्पवर दाखवली. सुश्मितानं फॅशन डिझायनर अनुश्री रेड्डीसाठी रॅम्प वॉक केला आणि यादरम्यान तिचा उत्साह अगदी पहिल्यासारखाच पहायला मिळाला. (Sushmita Sen ramp walk video from lakme fashion week after suffering heart attack)

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की सुश्मिता सेन पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. मोकळे केस आणि मोजकाच मेकअप तिच्या चेहऱ्याला शोभून दिसत आहे. सुश्मिता सेन रॅम्पवर शानदार वॉक करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सुश्मिता सेननं हार्ट अटॅक नंतर आपल्या फीटनेसवर काम सुरू केलं आहे. तिनं नुकतेच इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर केले होते,ज्यात ती योगा करताना दिसत आहे. ती एका मोकळ्या जागेत स्ट्रेचिंग करताना दिसत आहे.

सुश्मितानं फोटोला कॅप्शन दिलं होतं की, ''व्हील ऑफ लाइफ. माझ्या कार्डिओलॉजिस्टनं मला परवानगी दिली आहे. स्ट्रेचिंग सुरू झाली आहे. खूप छान वाटतंय. यंदाची होळी मस्त गेली,तुमची? तुम्हाला सगळ्यांना खूप सारं प्रेम''. सुश्मितानं सांगितलं की आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानं तिनं योगा करायला सुरुवात केली आहे.

सुश्मिताच्या हार्टअटॅकच्या बातमीनं तिचे चाहते भलतेच चिंतेत सापडले होते. तिनं एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं होतं-''माझ्या वडीलांनी मला सांगितलंय..आपल्या मनाला कायम आनंदी आणि मजबूत ठेव कारण हे जेव्हा गरज असेल तेव्हा तुमची चांगली साथ देतं. काही दिवसांपूर्वीच मला हार्ट अटॅक येऊन गेला. माझी एंजियोप्लास्टी झाली. माझी कार्डिओलॉजिस्ट म्हणाली तुझं हृदय खूप मोठं आहे''.

हेही वाचा: नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

सुश्मिता सेन लवकर रवी जाधव दिग्दर्शित 'ताली' सिनेमात दिसणार आहे. तिनं यात तृतीयपंथी गौरी सांवत हिची व्यक्तीरेखा साकारली आहे. हा एक बायोपीक आहे. चाहते या सिनेमाची चातकासारखी वाट पाहत आहेत.

'आर्या' या तिच्या वेबसिरीजच्या दोन्ही भागांना लोकांनी पसंत केलं आणि तिच्या अभिनयाची देखील प्रशंसा झाली. आता लोक वाट पाहत आहे 'आर्या ३' ची.

'आर्या ३' लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम केला जाणार आहे.